समांतर क्रांती / खानापूर
भाजपच्या सदस्यांनीच त्यांच्या ग्रा.पं. अध्यक्षांवर अविश्वास ठराव समंत पदावरून पायउतार व्हावे लागले आहे. बैलूर ग्रा.पं.अध्यक्ष रामलिंग ओमानी मोरे यांच्या विरोधात आज बुधवारी (ता.२२) अविश्वास ठराव मांडण्यात आला. त्यात १५ पैकी ११ सदस्यांनी अध्यक्षांच्या विरोधात मतदान केले तर तिघांनी अध्यक्षांच्या बाजुने मतदान केले. एक सदस्य अनुपस्थित राहिले. तर अन्य एक सदस्य मयत झाले आहेत.
बैलूर ही जांबोटी भागातील मोठी पंचायत आहे. पण, येथील राजकारण नेहमीच चर्चेचा विषय ठरत असते. आता एकाच पक्षात कार्यरत असलेल्या सदस्यांनी तालुक्यातील जेष्ठ नेत्यांकडे काणाडोळा करीत स्थानिक पातळीवर वेगळ्याच राजकारणाचे पत्ते पिसल्याने जांबोटी भागात भाजपला खिंडार पडण्याची ही नांदी असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
गेल्या महिनाभरापासून अध्यक्षांवरील अविश्वासाचा मुद्दा गाजत होता. तरीही तालुकास्तरीय नेत्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे भाजपमधील बंडाळी चव्हाट्यावर आली आहे. विशेष म्हणजे अविश्वास टाळण्यासाठी अध्यक्ष रामलिंग मोरे यांनी आमदार विठ्ठल हलगेकर यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण, त्यानी त्यांचा कॉल घेतला नसल्याचे समजते. त्यांनी यात हस्तक्षेप केला नसल्याने श्री.मोरे नाराज आहेत. एकंदर, आमदारांनी तालुक्याच्या विकासाप्रमाणेच पक्षकार्याकडेही दुर्लक्ष केले आहे का? असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे.
बेळगावच्या तरूणांचा हैदोस; महिलेस बेदम मारहाण
समांतर क्रांती / खानापूर बेळगाव येथील तरूणांच्या टोळक्याने महिलेस बेदम मारहाण करून कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना बैलूर (ता. खानापूर) येथे घडली आहे. या घटनेत लक्ष्मी रवळू कागणकर (४५) या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर बेळगाव येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बेळगाव येथील श्रीधर पाटील याच्यासह अन्य आठ जणांवर जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी […]