समांतर क्रांती / बंगळूर
(Video सौजन्य Nav Samaja)
अचानक कंटेनर कारवर कोसळल्याने एकाच कुटुंबातील सहा जण जागीच ठार झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्ग ४ वर घडली. नेलमंगल येथील ताळकेरे येथे हा अपघात घडला असून घटनास्थळावरील चित्र थरकाप उडविणारे होते. याबाबतची अधिक माहिती अशी, मूळचे जत्त तालुक्यातील मोरबगी (जि.सांगली-महाराष्ट्र) येथील आणि बंगळूरच्या एचआरएस लेआऊटमधील आयएएसटी या सॉफ्टवेअर कंपनीचे मालक चंद्रम् योगप्पगोळ यांचे संपूर्ण कुटुंब या अपघातात मृत झाले आहे.
माध्यमिक शाळांत दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी पुनर्सिंचन कार्यक्रम
शिक्षण विभागाने २०२४-२५ या वर्षात कर्नाटक राज्यातील सरकारी उच्च माध्यमिक शाळांमधील इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी पुनर्सिंचन कार्यक्रम राबविण्याबाबत महत्त्वपूर्ण आदेश जारी केला आहे. गतवर्षी दहावीच्या निकाल झालेली घट लक्षात घेऊन हा महत्वाकांक्षी कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षात दहावीच्या निकालात गुणात्मक वाढ होईल, असा विश्वास सरकारकडून व्यक्त करण्यात आला आहे. अर्थसंकल्पात […]