खानापूर: अस्वलाने अचानक हल्ला करून जखमी केल्यानंतरही रक्तबंबाळ आवस्थेत एक कि.मी.चालत जाऊन घर गाठून जीव वाचविल्याची घटना बुधवारी रामनगर (ता.जोयडा) जवळील तिंबोली येथे घडली. या घटनेत विष्णू तानाजी शेळके (वय ७२, रा. म्हाळुंगे, ता.चंदगड) असे या जखमी गवळ्याचे नाव असून त्याच्यावर बेळगाव येथील इस्पितळात उपचार सुरू आहेत.
याबाबतची अधिक माहिती अशी, विष्णू हे त्यांच्या नातवाला घेऊन जाण्यासाठी तिंबोलीला आले होते. ते रामनगरहून चालत निघाले असता रस्त्यात अचानक त्यांच्यावर अस्वलाने हल्ला केला. त्यांनी प्रतिकार करीत त्याच्या हल्ल्यातून सुटका करून घेतली. पण, ते या हल्ल्यात गंभीर जखमी झाले होते. त्याही स्थितीत ते तब्बल एक कि.मी. चालत तिंबोली येथील त्यांचे व्याही नानू थोरात यांच्या घरी पोहचले. तेथे त्यांच्यावर प्रथमोपचार करून १०८ रुग्णवाहिकेतून त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आले. त्यांचा एक डोळा अस्वलाच्या हल्ल्यात निकामी झाला आहे.
विष्णू शेळके हे त्यांच्या नातूला घेण्यासाठी म्हाळुंगेहून तिंबोलीला येत होते. त्यावेळी ही दुर्घटना घडली. रामनगर परिसरातील गवळीवाड्यांच्या परिसरात नेहमीच अशा घटना घडत असतात. वनखात्याने अशा घटनांची दखल घेत अस्वलांचा बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातील नागरीकांनी केली आहे.
एक भाऊ आणि तीन बहिणीनंतर अबुबकरला बनायचे आहे डॉक्टर
समांतर क्रांती… लोंढा येथील माजी जि.पं.सदस्य मुगुटसाब धारवाडी यांचे सुपुत्र अबुबकर याने नुकताच झालेल्या नीट परिक्षेत १७४६ वा रँक पटकाविला आहे. त्याला आता डॉक्टर बनायचे आहे. विशेष म्हणजे त्याचा भाऊ आणि तीन बहिणीदेखील डॉक्टर आहेत. तुम्ही राजकारण का सोडला यावर ‘मुलांच्या शिक्षणासाठी’ असे उत्तर देणारे मुगूटसाब धारवाडी यांनी त्यांचा शब्द खरा करून दाखवितांना त्यांच्या पाचही […]