खानापूर : भीमगड अभयारण्यात हेम्माडगा येथे वाघाच्या हल्ल्यात म्हैस ठार झाल्याची घटना आज बुधवारी (ता. 11) उघकडकीस आली. म्हैस मालक शेतकरी भीमाप्पा मल्लाप्पा हणबर (रा. तेरेगाळी, ता. खानापूर ) यांना सुमारे 40 हजारांचा फटका बसला आहे.
हेम्मडगा येथील जंगलात एक म्हैस आज मृतावस्थेत आढळून आली. म्हशीचा जंगली श्वापदाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले असून हा हल्ला वाघानेच केला असावा, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
घटनेची माहिती मिळताच वनाधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. हेम्माडगा गावाजवळ ही घटना घडली असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. पीडित शेतकऱ्याला नुकसान भरपाई दिली जाईल, असे वनखात्याकडून सांगण्यात आले.
गुन्हे प्रतिबंध मासानिमित्त खानापूरात जनजागृती
समांतर क्रांती / खानापूरगुन्हे प्रतिबंध मासानिमित्त बुधवारपासून (ता.11) खानापूर शहरात पोलीस खात्याच्यावतीने जनजागृती करण्यात येत आहे.अलीकडे शहर आणि ग्रामीण भागातदेखील गुन्हेगारीत वाढ झाली आहे. घरफोड्या, महिलांच्या दागिन्यांची चोरी, बसमध्ये लुबाडणूक असे प्रकार वाढत असून नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे, असे मत यावेळी पोलीस निरीक्षक मंजुनाथ नाईक यांनी व्यक्त केले.कुणीही अडचणीत असल्यास तात्काळ मदतीसाठी पोलीस तत्पर […]