समांतर क्रांती विशेष
बेळगाव ते धारवाड लोहमार्गासाठी नंदिहळ्ळी परिसरातील शेकडो एकर जमिनी संपादीत करण्याचा घाट घातला गेला आहे. त्याला शेतकर्यांनी तीव्र विरोध दर्शविला असून हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ठ आहे. उच्च न्यायालयाने शेतकर्यांना दिलासा दिला होता. पण, मनाईहुकुम उठल्यानंतर जमिन संपादीत करण्यासाठी हालचाली सुरू आहेत. एकीकडे शेतकर्यांचा विरोध आणि त्यासाठीची आंदोलने बळाचा वापर करून चिरडली जात असतांना दुसरीकडे मात्र उद्योजकांना अभय देण्यात आले आहे.
बेळगाव हा कित्तूर मार्गे धारवाडला जाणारा लोहमार्ग आहे. हा मार्ग धारवाड येथील बेलूर औद्योगिक वसाहतीतून जाणार होता. तसे झाले असते तर अपलेन्स कंपनीच्या बहुतांश जमिनी रेल्वेच्या ताब्यात गेल्या असत्या. पण, रेल्वेच्या अधिकार्यांनी कंपनीच्या विनंतीवरून तेथील लोहमार्गाची दिशा बदलली आहे. त्यामुळे शेतकर्यांची अतिरिक्त जमिन संपादीत केली जाणार आहे. एकंदर, उदद्योगपतींना अभय दिले जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या लोहमार्गाचे भिजत घोंगडे आहे. शेतकर्यांनी भूसंपादनास तीव्र विरोध दर्शविला असून त्यासाठी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. आता न्यायालयाने मनाईहुकुम उठविल्यानंतर भूसंपादनाच्या प्रक्रियेला सुरूवात केली जाणार आहे. पुढील तीन महिन्यात बेळगाव आणि धारवाड जिल्ह्यातील जमिनींचे सर्व्हेक्षण पूर्ण करण्यासाठी रेल्वे आणि कर्नाटक औद्योगिक वसाहत विकास निगमने लगीनघाई चालविली आहे.
चिगुळे: गाव तसं चांगलं, पण..?
समांतर क्रांती/विशेष रिपोर्ट सह्याद्रीच्या खुशीत घनदाट झाडीत लपलेले चिगुळे. सुर्यास्ताचे विलोभनीय दर्शन घडविणारे खानापूर तालुक्यातील लक्षवेधी ठिकाण. महाराष्ट्र आणि गोवा राज्याच्या हद्दीवर वसलेल्या या गावातील माऊली देवीमुळे तिन्ही राज्यांचे ॠणाणुबंध जुळले आहेत. दरवर्षी हजारो पर्यटक, भाविक गावाला भेट देतात. तेथील निसर्गसौदर्य इतके विलोभनीय आहे की, प्रत्येकजण तेथील आठवणी सोबत घेऊनच जातो.चिगुळेचे तोंड भरून कौतुक न […]