समांतर क्रांती / ब्यूरो रिपोर्ट
जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात सरहद्दीजवळ मंगळवारी (ता. २४) सायंकाळी लष्कराचे वाहन ३५० फूट खोल दरीत कोसळले. या अपघातात बेळगाव तालुक्यातील पंत बाळेकुंद्री येथील दयानंद तिरकण्णवर हे जवान शहीद झाले आहेत, तशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांना कळविण्यात आली आहे. हुतात्मा दयानंद यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.
जम्मू-काश्मिरमधील मेंढर या भारत-पाक सरहद्दीजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने लष्कराचे वाहन दरीत कोसळले. या अपघातात पाच जवान शहिद झाले. त्यामध्ये दयानंद तिरकन्नावर यांचा समावेश आहे. त्यांचे पार्थिव केव्हा येणार याबाबत अद्याप जिल्हा प्रशासनाला माहिती देण्यात आलेली नाही. दरम्यान, लष्कारकडून सदर माहिती कुटुंबीयांना मिळाल्यानंतर पंत बाळेकुंद्री गावावर शोककळा पसरली आहे.
बेळगाव जिल्ह्यातील दोघांसह राज्यातील चार जवान शहिद
समांतर क्रांती मंगळवारी (ता.२४) जम्मू-काश्मिरमधील पुंछ-मेंढर परिसरात भारतीय लष्कराचे वाहन ३५० फूट दरीत कोसळल्याने झालेल्या भीषण अपघातात पाच जवान शहिद झाले. त्यात कर्नाटकातील तिघांचा समावेश आहे. तर मनिपूरमध्ये झालेल्या अन्य एका अपघातात दोन जवान शहिद झाले. त्यात चिकोडी येथील जवानाचा समावेश आहे. शहिद झालेल्या जवानांमध्ये पंतबाळेकुंद्री बेळगाव येथील दयानंद तिरकन्नावर (४४) आणि कुप्पनवाडी- चिकोडी येथील […]