राज्यातील ६२ आयपीएस अधिकाऱ्यांना बढतीची लॉटरी
बंगळूर: सरत्या वर्षाच्या पुर्वसंध्येला राज्यातील आय.पी.एस. अधिकाऱ्यांना नववर्षाची भेट राज्य सरकारने दिली आहे. ६२ आपीएस अधिकाऱ्यांना बढती मिळाली असून त्यापैकी चार जणांची बदली करण्यात आली आहे. तर उर्वरित सर्व अधिकाऱ्यांच्या वेतनश्रेणीत वाढ करून सध्या कार्यरत ठिकाणीच सेवा कायम करण्यात आली आहे. पुढील आदेशापर्यंत हे अधिकारी त्याच ठिकाणी सेवा बजावतील, असे सरकारने काढलेल्या अध्यादेशात म्हटले आहे.
बेळगाव जिल्हा पोलिस प्रमुखांना बढती..
बेळगावचे जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांना बढती मिळाली आहे. त्यांना अधिक्षक या पदावर नियुक्त दर्जा (सिलेक्शन ग्रेड) देण्यात आला आहे. तुर्तास त्यांची बदली करण्यात आलेली नाही. त्यामुळे पुढील आदेशापर्यंत ते बेळगाव जिल्हा अधिक्षक म्हणून कार्र्यथ राहणार आहेत.
पोलिस महानिरिक्षकांची बदली..
उत्तर विभागाचे पोलिस महानिरीक्षक विकास कुमार विकास यांची बंगळूर दक्षिणचे आयजीपी आणि अतिरिक्त पोलिस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याजागी चेतन सिंग राठोड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना सहाय्यक पोलिस महानिरीक्षक पदावरून बढती मिळाली असून ते उत्तर विभागाचे पोलिस महानिरीक्षक म्हणून कार्यरत राहणार आहेत.
सीमा लाटकर यांना बढती
बेळगावमध्ये सेवा बजावलेल्या म्हैसूरच्या पोलिस आयुक्त सीमा लाटकर यांनाही बढती मिळाली आहे. त्यांना पोलिस महानिरीक्षक दर्जा देण्यात आला आहे.
काळ कठीण, तरीही सहकार चळवळ टिकविण्याची गरज
जांबोटी मल्टीपर्पजच्या खानापूर शाखेचा रौप्य महोत्सव उत्साहात समांतर क्रांती / खानापूर ज्या काळात खानापूर तालुक्यात सहकार चळवळीची सुरूवात झाली तो काळ मागासलेपणाचा होता. आज सहकार क्षेत्र ऐन उमेदीत असतांना ही चळवळ चालविणे जिकीरीचे बनत चालले आहे. काळ कठीण आहे, पण आर्थिक पाठबळासाठी सहकारी संस्था जिवंत राहिल्या पाहिजेत, त्या जगविण्याची जबाबदारी सर्वांचीच असल्याचा सूर आज बुधवारी […]