
समांतर क्रांती / खानापूर
येथील चौराशीदेवी संगीत कला मंच आयोजित ‘विठ्ठल नाद’ संगीत भजन स्पर्धेत गोल्याळी येथील श्री रवळनाथ भजनी मंडळाने प्रथम क्रमांक पटकाविला. या स्पर्धेत तालुक्यातील १५ भजनी मंडळांनी सहभाग घेतला होता.
स्पर्धेत जांबोटीच्या श्री रामकृष्ण भजनी मंडळाने दुसरा क्रमांक पटकाविला.तर दारोळी येथील शिवगणेश भजनी मंडळ, हब्बनहट्टीच्या स्वयंभू हनुमान भजनी मंडळ, कुपटगिरी येथील विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळाने अनुक्रमे क्रमांक मिळविले. या सर्व विजेत्या ममडळांना रोख पारितोषीके देऊन सन्मानीत करण्यात आले.
या स्पर्धेत भाग घेतलेल्या इतर सर्व भजनी मंडळांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आली. यावेळी म.ए.समिती नेते बाळासाहेब शेलार, समितीचे सरचिटणीस आबासाहेब दळवी, मुख्याध्यापक महेश सडेकर, संगीत विशारद मष्णु चोर्लेकर, ग्रा.पं.सदस्य दिगंबर केसरेकर, रामचंद्र पाटील, कृष्णाजी देवलकर यांच्या हस्ते पारितोषीकांचे वितरण करण्यात आली. प्रास्ताविक मष्णु चोर्लेकर तर सूत्रसंचालन महेश सडेकर यांनी केले. यावेळी चौराशीदेवी संगीत कला मंचचे पदाधिकारी, सदस्य आणि भजन रसिक उपस्थित होते.
निलगिरीची तस्कारी: नंदगडचा ट्रक चालक, ओलमनीच्या इसमाचा सहभाग
समांतर क्रांती / खानापूर बोगस पासचा वापर करून निलगिरीच्या लाकडांची तस्करी करणारा एक ट्रक नंदगड पोलिसांनी जप्त केला आहे. नंदगड येथील मोहमद्द इक्बाल मोहमद्दगौस मिरजकर (रायापूर-नंदगड) हे त्यांच्या ट्रकमधून निलगिरीची वाहतूक करीत होते. तर त्यांना ओलमणी येथील इसमाने सदर पास दिल्याचे तपासात उघड झाले आहे. मोहमद्द इक्बाल हे निलगिरी लाकूड भरून जात असतांना संशयावरून तपासणी […]