
समांतर क्रांती / चेतन लक्केबैलकर
कोकणाची सोनेरी किनार लाभलेला खानापूर तालुक्याचा पश्चिम घाट, त्यातच सह्याद्रीच्या कुशीत वसलेली खुराड्यासारखी गावं.. शिव छत्रपती आणि छत्रपती संभूराजेंच्या पदस्पर्शाने पावन झालेला ‘भीमगड’ आणि या किल्ल्याचा परिसर आज चर्चेत आहे. शापीत बनत चालेललं हे जंगल ‘माणसांनाच खायला उठलंय की काय?’
दोन दिवसांपूर्वी गवाळीच्या तरूणाने नेरसेजवळ जंगलात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही नेहमीसारखीच घटना म्हणून मुडद्याला मुठमाती दिली गेली असली तरी परिस्थिती हाताच्या बाहेर गेली आहे, असं गावकरी म्हणताहेत. का? कारण गेल्या जून महिन्यापासून आतापर्यंतच्या आवघ्या आठ महिण्यात एका गवाळी गावातील पाच जणांनी आत्महत्या केली आहे तर तीघांना संशयास्पद मृत्यू झाला आहे.
कोकणची माणसं साधीभोळी, हे गवाळीसह आवघ्या पश्चिम घाटाच समिकरण. त्यामुळे कुणीच कुणाचा दुश्मन नाही. दुश्मनी कररायची तरी कुणाशी? आणि का? त्यामुळे या आत्महत्या होतायत तरी का? कशासाठी? कुणामुळे? या डोंगराएवढ्या प्रश्नाने केवळ गवाळीवासीयाच नाहीत, तर या अभयारण्यातील तेरा गावात गहजब माजला आहे. कारण, प्रत्येक गावात गेल्या वर्षभरात किमान एकतरी तरूणाने आत्महत्या केली आहे. तरूणच का आत्महत्या करताहेत? याचा शोध कुणीच घेत नाही. त्याउलट ‘देव कोपल्या’चे एकमेव कारण या आत्महत्यामागे असल्याचे माणून ही बोळी माणसं ‘उरावर दगड’ठेवून दिवस काढताहेत. पण, यामागील प्रमुख कारणांचा शोध घेण्याचं नुसतं धाडसही ना प्रशासकीय यंत्रणा करतेय, ना समाजसेवकांची झुल पांघरून शासकीय कार्यालयात हप्ते वसुली करणारे करीत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार गेल्या आठ महिन्यात भीमगड अभयारण्यातील तेरा गावात बाराहून अधिक तरूणांनी आत्महत्या केल्या आहेत, तर सुमारे २० ते २५ जणांना विविध आजारांनी मृत्यू झाला. आठवड्याला एकजण दगावला जात असल्याने भिती तर आहेच; पण त्याही पलिकडे ही समस्या सुटणार कशी हा जटिल प्रश्न स्थानिकांना पडला आहे. हा फक्त आणि फक्त सामाजिक समस्येचा परिपाक आहे, एवढेच यावरील उत्तर आहे.
विकासाचा अभाव त्यामुळे वाढलेली लग्नाळू तरूणांची संख्या, प्राथमिक उपचार मिळत नसल्याने होणारे मृत्यू हीच मोठी समस्या आहे. पण, तालुक्यातील ‘द्गिमुढ, लायकी नसलेले विकास पुरूष’ या समस्येच्या मुलाशी जाणार कधी हाच सध्याचा प्रमुख प्रश्न आहे…
या संदर्भातील सविस्तर ‘ऑन दि स्पॉट रिपोर्ट’ लवकरच प्रसिध्द करीत आहोत…

रंगपंचमीने केला रंगाचा बेरंग; तीन चिमुकल्यांचा मृत्यू दुर्दैवी
बेळगाव: रंगपंचमीने रंगाने बेरंग केल्याच्या घटना काल जिल्ह्यातील दोन ठिकाणी घडल्या. यात घटनांत तीन चिमुकल्या शाळकरी मुलांना जीव गमवावा लागल्याने नको ती रंगपंचमी असे म्हणण्याची वेळ पालकांवर आली आहे. चिकोडीजवळील एकसंबा येथे रंगपंचमीनंतर विहिरीत पोहण्यास गेलेल्या वेदांत हिरकोडी (११) व मनोज कल्याणी (९) या दोघा मित्रांचा बुडून मृत्यू झाला. तर चिकोडी जवळीलच बारवाड येथे रंग […]