समांतर क्राती / खानापूर
गणेबैलजवळील भूतनाथ यात्रेचा मान यंदा माळअंकले गावाला असून ही यात्रा मंगळवारपासून (ता.२४) सुरू होणार आहे. दुपारी १२ वाजता महापुजेने यात्रेला सुरूवात होईल. यावेळी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी (ता.२५) यात्रेची सांगता होणार आहे.
गणेबैलजवळील भूतनाथ देवस्थानाच्या यात्रोत्सवाचा मान माळ अंकले आणि झाड अंकले या गावांना असतो. यंदा हा मान माळअंकले गावाला आहे. यात्रोत्सव काळात विविध धार्किक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामस्थ आणि श्री भूतनाथ मंदिर व्यवस्थापन मंडळाच्यावतीने यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
विशेष आकर्षण
माळ अंकले आणि झाड अंकले या गावांत दरवर्षी यात्रोत्सवानिमित्त नाटकांचे आयोजन करण्यात येते. या दोन्ही गावांची नाट्यपरंपरा जिवंत ठेवली असून यंदाही नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी रात्री १० वाजता ‘शपथ तुला मंगळसुत्राची’ (अर्थात कुंकवाचा वैरी) हा नाट्यप्रयोग होणार आहे.
सीमाप्रश्न ही भळभळती वेदना: रंगनाथ पठारे
समांतर क्रांती / खानापूर बेळगाव-खानापूरचा हा परिसर खूप सुंदर आहे. सौदर्य सगळ्यानाच आवडतं, पण याच सौदर्यामुळे सीमावासीयांचे हाल होत आहेत. महाराष्ट्र आणि कर्नाटक दोन्ही राज्ये या भागावर दावा करीत आहेत. भाषा आणि साहित्याच्या निवाऱ्यात राहून व्यवहार करायचा असतो, परंतु येथे निवाऱ्याबाहेर राहून व्यवहार करावा लागत आहे. परिणामी, अनेक पिढ्यांचे नुकसान झाले, ही भळभळती वेदना असल्याची […]