नंदगड: डोकीत वार करून वृद्धाचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना खानापूर तालुक्यातील भूत्तेवाडी येथे उघडकीस आली आहे. लक्ष्मण यल्लप्पा सुतार (७५) असे खून झालेल्या वृद्धाचे नाव असून खुनामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. नंदगड पोलीस अधिक तपास करीत आहेत.
मराठा समाजाचा तडफदार युवा नेता अभिलाष देसाई
मोठ्या पगाराची नोकरी किंवा बेफाम पैसा मिळवून देणारा व्यवसाय, चारचाकी गाडी आणि टोलेजंग बंगला, सुदरशी पत्नी आणि एखादे मुलं, ही आजच्या तरूणांची सर्वसामान्य स्वप्नं आहेत. त्याच्या पलिकडे जाऊन आपल्या समाजासाठी, आपल्या लोकांसाठी निस्वार्थपणे कार्य करण्याची संवेदनशीलता आजचा तरूण हरवत चालला आहे. केवळ चार भिंतीतलं विश्व आजच्या तरूणांना खुणावत असतांना एखादा तरूण स्वयंप्रेरणेने समाजाच्या भल्याचा विचार […]