समांतर क्रांती / बेळगाव
खानापूर तालुक्यातील नंदगड आणि बिडी ग्राम पंचायतींना नगर पंचायतीचा दजार देण्याची मागणी आमदार विठ्ठल हलगेकर यांनी आज बुधवारी विधानसभेत केली.उत्तर कर्नाटक विकासासंदर्भातील चर्चेवेळी त्यांनी हा मुद्दा मांडला. यावेळी त्यांनी तालुक्याच्या विकासासाठी शंभर कोटींचे विशेष पॅकेज मंजूर करण्याची मागणीही केली.
यावेळी बोलतांना श्री. हलगेकर म्हणाले, खानापूर हा बेळगाव जिल्ह्यातील अतिदुर्गम तालुका आहे. येथील जनतेला विविध समस्यांचा सामना करावा लागतो. दुर्गम भागात अद्यापही वीज, पाणी आणि रस्त्यांची समस्या आहे. अतिवृष्टीमुळे यंदा अनेक रस्त्यांची दूरवस्था झाली आहे. रस्ते विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी विशेष निधीची घोषणा केली होती. तो निधी अजून मिळालेला नाही. खराब रस्त्यांवरून प्रवास करतांना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे.
अभयारण्यातील कुटुंबाना आधी जागेची व्यवस्था करावी, त्यानंतरच त्यांच्या स्थलांतरासाठी प्रयत्न व्हावेत. तालुक्याच्या विकासासाठी शंभर कोटींचे विशेष पॅकेज मंजूर केल्यास अनेक समस्या सुटू शकतात, असेही ते म्हणाले.
चलो खानापूर : तहशिलदारांना निवेदन सादर करणार..
समांतर क्रांती / खानापूर केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला असून त्यांचा निषेध नोंदविण्यासाठी उद्या गुरूवारी (ता.१९) ११ वाजता तहशिलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. यावेळी काँग्रेसच्यावतीने तहशिलदारांना निवेदन सादर केले जाणार आहे. तरी तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्ते आणि दलित संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष ॲड. आय. आर. […]