कुमठा: येथे आयोजीत करण्यात आलेल्या प्रचार सभेला उपस्थि राहण्यासाठी भटकळ आणि उत्तर कन्नड (कारवार) जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी भव्य अशी बाईक रॅली काढून शक्तीप्रदर्शन केले. जिल्हा पालकमंत्री मंकाळू वैद्य यांची मुलगी मीना वैद्य यांच्या नेतृत्वाखाली भटकळ ते कुमठापर्यंत काढण्यात आलेल्या रॅलीत उमेदवार डॉ. अंजली निंबाळकरदेखील सहभागी झाल्या होत्या. एकंदर, ही रॅली इतकी भव्य होती की, त्यामुळे विराधकांच्या उरात धडकी भारली आहे.
दुपारी भटकळमधील मुरडेश्वरमधून रॅलीला सुरूवात झाली. हजारोंच्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते, मंकाळू वैद्य आणि डॉ. अंजली निंबाळकर यांचे समर्थक या रॅलीत सहभागी झाले होते. रॅलीची सांगता कुमठा येथील गेरूसोप्प चौकात झाली. तेथून उमेदवार डॉ. निंबाळकर आणि मीना वैद्य यांनी वाहनातून शहरवासीयांना अभिवादन करीत तसेच काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन करीत सभास्थळी प्रयान केले. रॅलीतील जनसमुदाय आणि तळपत्या उन्हातही कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून शहरवासीय रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून डॉ. निंबाळकर यांना हात उचावून जणू पाठिंबा जाहीर करीत होते.
रॅलीतील जय बजरंगचे निशान लक्षवेधी ठरले होते. समुद्रासारख्या जनसमुदायाच्या सहभामुळे विरोधकांना मात्र धडकी भरली असल्याचे दिसून आले. रॅलीतील सहभागी कार्यकर्त्यांकडून काँग्रेस आणि डॉ. निंबाळकर यांच्या विजयाच्या गगणभेदी घोषणा दिल्या जात होत्या, त्यामुळे आवघा परिसर दणाणून गेला होता. आजच्या रॅलीने डॉ. अंजली निंबाळकर यांच्या विजयावर शिक्कामोर्तब केला असल्याची प्रतिक्रीया यावेळी मीना वैद्य यांनी माध्यमांशी बोलतांना व्यक्त केली.
भाजप दिलेला शब्द कधीच पाळत नाही
उपमुख्यमंत्री डी.के.शिवकुमार यांचा आरोप; कुमठा येथे डॉ. अंजली निंबाळकर यांची प्रचारसभा कुमठा: अघोषीत हुकुमशाहीला घाबरू नका असे आवाहन देशातील लोकांना करीत राहुल गांधी यांनी देशभर भारत जोडो यात्रा केली. आम्हीही कर्नाटकात प्रजाध्वनी (जनतेचा आवाज) यात्रा सुरू केली आहे. आम्ही कुणाला फसविले नाही, विधानसभा निवडणुकीत जी आश्वासने दिली ती आवघ्या महिनाभरात पूर्ण केली. कोणतीही योजना जाती-धर्मावर […]