समांतर क्रांती / जांबोटी
प्रंसगावधानामुळे वाघाच्या संभाव्य हल्ल्यातून दुचाकीस्वार बालंबाल बचावल्याची घटना तळावडे-गोल्याळी मार्गावर घडली. तोराळी येथील जेसीबी मालक आकाश पाटील आणि जेसीबी चालक प्रदीप चव्हाण अशी या दुचाकीस्वारांची नावे आहेत.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी, शुक्रवारी रात्री आठच्या सुमरास आकाश आणि प्रदीप हे तोराळीकडे निघाले असता रस्त्यात त्यांना मुक्त संचार करणाऱ्या वाघाचे दर्शन घडले. वाघ रस्त्यावरून चालला असल्याने त्यांनी दुचाकी थांबवून वाघ जंगलात जाण्याची वाट पाहू लागले. वाघ कांही अंतर गेला. पण, कांही वेळाने दुचाकीस्वारांच्या दिशेने येऊ लागला. वाघ हल्ला करणार याची चाहूल लागताच त्या दोघांनी प्रसगावधान राखून तेथून दुचाकीवर पळ काढला.
दुचाकीवरून मागे फिरल्याने वाघदेखील तेथून जंगलात पसार झाला. चक्क रस्त्यावरून वाघ मुक्त संचार करीत असल्याने तळावडे-तोराळी आणि गोल्याळी परिसरात घबराट पसरली आहे. वनखात्याने नागरीकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
वनखात्याकडूनच ‘वनहक्क कायदा’ धाब्यावर..
हरसनवाडी-गवळीवाड्यावरील शेड पाडले; लाकूड चोरीचा आळ समांतर क्रांती / खानापूर वननिवासी आणि वनखात्याचा संघर्ष नेहमीचाच बनला आहे. वनखाते नेहमीच वनहक्क कायद्याची पायमल्ली करीत असल्याने खानापूर तालुक्यातील वननिवासींचे जगणे मश्किील झलो आहे. हरसनवाडी – गवळीवाडा येथील गवळी बाबू कोकरे यांच्यावर लाकूड चोरीचा आळ घेत वनकर्मचाऱ्यांने कोणतीही पूर्वकल्पना न देता नव्याने उभारण्यात आलेले पत्र्याचे शेड पाडल्याने संताप […]