माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी पुन्हा एकदा रामदूर्ग येथे लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील सरकार बदलणार असल्याची वल्गना केली आहे. गेल्या कांही दिवसांपासून सरकार बदलण्यासंदर्भात भाजपने आघाडी घेतली असली तरी त्याचा विपरीत परिणाम भाजपवरच होत असल्याचे सामान्य कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. सरकार बदलल्यास काँग्रेस महिलांना महिना दोन हजार देत असलेली योजना बंद होणार आहे. मोफत बस प्रवासही बंद होईल, त्यासाठी आपले काँग्रेसच बरे, असा सूर महिला वर्गातून ऐकू येत आहे.
रामदूर्ग येथील सभेत बोलतांना माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी राज्यात काँग्रेस सरकार जास्त काळ टिकणार नसल्याचे म्हटले. तत्पूर्वी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही ‘ऑपरेशन कमळ’चा मुद्दा उपस्थित केला होता. त्यामुळे भाजपचा कंडू अद्याप थंड झाला नसल्याचे दिसून येत असून सर्वसामान्य जनतेत मात्र याबद्दल संताप व्यक्त होत आहे.
विशेषत: महिला मतदार भाजपच्या मनसुब्यांवर प्रचंड नाराज आहेत. काँग्रेस सरकारने बोलल्याप्रमाणे पाच ‘गॅरंटी’ लागू करून दिलासा दिला आहे. महिलांना प्रतिमहा दोन हजार, बस प्रवास मोफत, वीजबिल माफ, बेरोजगार आणि शिकावू तरूणांना अनुदान अशा महत्वाच्या योजना आमलात आणल्या आहेत. केंद्रातल्या मोदी सरकारने महागाईचा वारू मागे लावल्याने त्रस्त झालेल्या जनतेला त्यातून दिलासा देण्याचे काम कर्नाटकातील सरकार करीत असतांना त्या योजना बंद करून जनतेला पुन्हा भिकेला लावण्याचा डाव भाजपचे नेते आखत आहेत का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. केंद्रात सराकर आल्यानंतर महिलांना प्रत्येक महिन्याला आठ हजार रुपये तसेच तरूण, शेतकरी यांच्यासाठी महत्वाकांक्षी योजना काँग्रेसने जाहीर केल्या आहेत. आपण हरणार हे कळून चुकल्याने भाजपचे नेते बेताल वक्तव्य करीत असून त्यांच्या अशा बतावणीला भुलू नये, असे आवाहन महिला घटक अध्यक्षा अनिता दंडगल यांनी केले आहे.
भाजपचे उेमदवार विश्वेश्वर हेगडे-कागेरींचे खलीलशी संबंध?
कारवार: मतदानाला कांही तास शिल्लक असतांनाच भाजप उमेदवार विश्वेश्वर हेगडे-कागेरी यांचा पडद्यामागील चेहरा उघडा पडला आहे. स्वत:स कट्टर हिंदुत्ववादी समजणारे कागेरी यांचे सी.ए.खलील याच्याशी संबंध असल्याचे फोटो समोर आले असून उत्तर कन्नडसह खानापूर आणि कित्तूरमध्ये खळबळ माजली आहे. कागेरी यांना तात्काळ अटक करण्याची मागणी डॉ. बी.आर.आंबेडकर सेवा समितीचे हरिष बाबू एम यांनी केली आहे. प्रक्षोभक […]