खानापूर: तालुक्यातील भाजपचा प्रभाव असलेल्या लोंढा येथील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आज शनिवारी (ता.०४) काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने भाजप नेते चांगलेच हवालदिल झाले आहेत. यावेळी निधर्मी जनता दलाच्या कांही कार्यकर्त्यांनीदेखील काँग्रेसचा हात धरून पक्षाला धक्का दिला आहे. BJP-JDS functionaries from Londha joined Congress.
लोंढा येथील बेन्नी पिंटो यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे एस.टी.मोर्चा अध्यक्ष जयवंत नाईक, भाजप दलित मोर्चा तालुका उपाध्यक्ष संतोष चितळे, प्रकाश बरीगीदडवर, एससी एसटी महिला अध्यक्ष जयश्री नाईक, मिनाक्षी अंनतपूर यांच्यासह निजदचे सचीव सिनू उरीकोंडा, परशुराम बदियार रक्षण वेदिकेचे रामा होसमनी, सन्नव्वा नाईक यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
लोंढा परिसरातील दलित आणि मागासवर्गीय मतांचे यामुळे धृविकरण शक्य असल्याने भाजप नेत्यांमध्ये खळबळ माजली आहे. तालुक्यातून मोठ्या प्रमाणात भाजप आणि निजद कार्यकर्ते काँग्रेसवासी होत असल्याने ही भाजपचे उमेदवार विश्वेश्वर हेगडे-कागेरींसाठी धोक्याची घंटा आहे. तर काँग्रेसच्या उमेदवार डॉ. अंजली निंबाळकर यांच्यासाठी विजयाचा मार्ग सुकर करणारी घटना आहे. यावेळी वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. आय.आर.घाडी, महादेव घाडी, विनायक मुतगेकर, सुरेश जाधव यांच्यासह लोंढ्यातील डॉ. अंजलीप्रमी नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Road Show: डॉ.अंजली निंबाळकरांनी दुचाकी चालवून वेधले लक्ष
कारवार शहर काँग्रेसमय; हजारो कार्यकर्त्यांचा रॅलीत सहभाग Road Show: Dr. Anjali Nimbalkar attracted attention by riding a two-wheeler कारवार: मतदानाचा दिवस जसजसा जवळ येऊ लागला आहे, तसतसा प्रचाराचा जोर वाढत आहे. काँग्रेसच्या उमेदवार डॉ. अंजली निंबाळकर यांच्या प्रचारार्थ आज शनिवारी (ता.४) कारवार येथे भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली. यावेळी उमेदवार डॉ. अंजली निंबाळकर यांच्यासह आमदार […]