
समांतर क्रांती / खानापूर
द्वेषाचं राजकारण करणाऱ्या स्थानिक भाजपच्या नेत्यांना नगर पंचायतीने जोर का झटका दिला आहे. विधान परिषद माजी सदस्य महांतेश कवठगीमठ आणि भाजपचे माजी शहराध्यक्ष सुनिल नायक यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारा फलाक लावला होता. तो आवघ्या कांही तासात हटविला. फलकावर केवळ मराठी असल्याने फलक हटविल्याचे नगर पंचायतीने म्हटले असून आता भाजपवाल्यांना कसं वाटतंय? असा प्रश्न मराठी भाषकांतून विचारला जात आहे.
कर्नाटकी शासनाचा मराठीवरील अन्याय हा नेहमीचाच बनला आहे. त्यासाठी म.ए.समितीकडून एकाकी झुंज देण्याचा प्रयत्न होत असतांना इतर राष्ट्रीय पक्षातील मराठी नेते मात्र हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवतात. निवडणुकांच्या प्रचारात मराठीला स्थान देणाऱ्या भाजपकडून मराठी भाषा, छ. शिवरायांचा अवमान अशावेळी साधा निषेध नोंदविण्याचेही औदार्य दाखविले जात नाही. त्यामुळे आता शासनाकडूनच त्यांच्या या कृत्याला उत्तर मिळाले आहे, अशी संतप्त प्रतिक्रीया उमटत आहे.
मराठीबद्दल पोटशूळ असलेल्या कर्नाटक शासनाने सर्व फलक कन्नड लिहिण्याची सक्ती चालविली आहे. त्यातून शुभेच्छा फलकदेखील सुटले नाहीत. बुधवारी रात्री भाजपने शिवस्मारक चौकात लावलेला फलक केवळ मराठीत आहे म्हणून काढून टाकला. विशेष म्हणजे या फलकावर पंतप्रधानांसह अनेक भाजप नेत्यांची छायाचित्रे होती. तरीही ते फोटो हा फलक वाचवू शकले नाहीत. नगर पंचायतीने हा फलक केवळ मराठीत असल्याने आणि परवानगी नसल्याने हटविल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता भाजपचे नेते काय भूमिका घेणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे.

माजी जिल्हाधिकारी कुटिन्हो यांचे निधन; काय आहे खानापूर कनेक्शन?
समांतर क्रांती / चेतन लक्केबैलकर Former District Collector Coutinho passes away; What is the Khanapur connection? बेळगावचे माजी जिल्हाधिकारी बी.ए. कुटिन्हो यांचे काल गुरूवारी (ता.१६) निधन झाले. कुतिन्हो हे कडक शिस्तीचे जिल्हाधिकारी म्हणून परिचीत होते. १६ मे १९८५ ते २३ मे १९८७ असा दोन वर्षांचा काळ ते बेळगावचे ७१ वे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांनी […]