कारवार: भाजपने देशभर नौटंकी चालविली आहे. खोटे बोलल्याशिवाय भाजपच्या नेत्यांचा दिवस जात नाही. त्यामुळे कर्नाटकातील जागृत मतदारांनी भाजपला नाकारले. यावेळी देशही भाजपला नाकारेल. विकास किंवा पायाभूत योजनांचा थांगपत्ता नाही. देशातील गोर-गरिब जनता रस्त्यावर आली आहे, तरीही भाजपला पुन्हा एक संधी हवी आहे. केवळ मोदींच्या नावावर मते मागतांना या भाजपच्या नेत्यांना लाज वाटायला हवी, असा घणाघात कारवारचे जिल्हा पालकमंत्री मंकाळू वैद्य यांनी भाजपवर केला. #Dr.Anjali Nimbalkar
उत्तर कन्नड लोकसभा मतदार संघाच्या काँग्रेसच्या उमेदवार डॉ. अंजली निंबाळकर यांच्या प्रचारार्थ भटकळ तालुक्यातील मावळी येथे आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी बोलतांना उमेदवार डॉ. अंजली निंबाळकर म्हणाल्या, ना खाऊंगा; ना खाने दुंगा म्हणत गरिबांना रस्त्यावर आणणाऱ्या कंपन्यांकडून कोट्यवधींचे इलेक्टॉल बॉन्ड घेऊन देशाला लुटले आहे. केवळ विरोधकांवर टीका करायची, खोटे आरोप करायचे यापलिकडे गेल्या दहा वर्षात भाजपने कांहीच केलेले नाही. कर्नाटकात काँग्रेसने जी अश्वासने दिली, ती सरकार अस्तित्वात येताच आवघ्या महिनाभरात पूर्ण केली. त्यामुळे राज्यातील जनतेला आता कळून चुकले आहे, खरा विकास हा काँग्रेसशिवाय शक्य नाही. BJP leaders should be ashamed of asking for votes in favor of Modi
खानापूर तालुक्याची आमदार असतांना केवळ पाच वर्षात तालुक्यात ऐतिहासिक कामगिरी केली आहे. अनेक विकास कामे राबवून सामान्य जनतेला दिलासा दिला आहे. तर भाजपने केवळ थापा मारून इतकी वर्षे जनतेला झुलवत ठेवले आहे. पण, आता जनता जागृत झाली असून भाजपला त्यांच्या जागा दाखवून दिली जाईल, असे डॉ. निंबाळकर म्हणाल्या. जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष रामा मोगेर म्हणाले, अनंतकुमार हेगडेंनी कधीच मतदार संघातील समस्या संसदेत मांडल्या नाही. ३० वर्षे केवळ खुर्ची गरम केली. संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्या भाजपला हद्दपार करण्याची हीच वेळ आहे.
भटकळ तालुक्यातील सारदहोळे, शिराळी, मावळ्ळी येथील प्रचार सभांना हजारो कार्यकर्त्यांनी हजेरी लावत डॉ. निंबाळकर यांना बहुमतांने विजयी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. प्रसंगी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष साई गावकर, विश्वास अमीन, अब्दूलमजिद शेख, वेंकटेश नायक, नयना नायक, सुकरा नायक, देवीदास गुडीगार, कृष्णा भंडारी यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.
सरदेसाईंचा सोमवारी तर डॉ. निंबाळकरांचा मंगळवारी उमेदवारी अर्ज
खानापूर: उत्तर कन्नड लोकसभा मतदार संघातून भाजपचे उमेदवार विश्वेश्वर हेगडे – कागेरी यांनी शुक्रवारी (ता.१२) उमेदवारी अर्ज दाखल केला. म.ए.समितीचे उमेदवार निरंजन सरदेसाई हे सोमवारी (ता.१५) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तर मंगळवारी (ता.१६) काँग्रेसच्या उमेदवार डॉ. अंजली निंबाळकर मोठ्या शक्तीप्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तिन्ही उमेदवारांनी प्रचाराला धडाक्यात सुरूवात केली असून उमेदवारी अर्ज […]