- मंत्री लक्ष्मी हेब्बाळकरबद्दल अश्लिल वक्तव्य, काँग्रेसकडून निषेध
- समांतर क्रांती / बेळगाव / खानापूर
महिला आणि बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याबद्दल अश्लिल वक्तव्य केल्याप्रकरणी माजी मंत्री व भाजपचे आमदार सी.टी. रवी यांना हिरेबागेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. रात्री आठ वाजता त्यांना खानापूर पोलिस स्थानकात आणले आहे. BJP MLC C.T. Raveena arrested; ‘Hydrama’ at Khanapur police station. Unparlimantory statement about Minister Laxmi Hebbalkar.
सुवर्णसौधमध्ये विधान परिषदेत चर्चा सुरू असतांना भाजपचे माजी मंत्री आणि विधान परिषद सदस्य सी.टी. रवी यांनी ना. हेब्बाळकर अपशब्द वापरला. त्यामुळे हेब्बाळकर यांनी रडत सभागृह सोडले. ही बातमी वाऱ्यासारखी पसरल्यानंतर ना. हेब्बाळकर यांच्या समर्थकांनी सी.टी.रवी यांना जाब विचारला.
काँग्रेसने यासंदर्भात सभापतींकडे तक्रार केल्यानंतर हिरेबागेवाडी पोलिस स्थानकात भादंवी कलम ७५ व ७९ अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तात्काळ त्यांना अटक केली. दरम्यान, सभागृहात बाहेर पडल्यानंतर आपणावर हल्ला झाल्याचा आरोप सी.टी.रवींनी केला आहे.
- सी.टी.रवी खानापूर पोलिस स्थानकात..
दरम्यान, रात्री आठच्या सुमारास आमदार सी.टी.रवी यांना खानापूर पोलिस स्थानकात आणले. हिरेबागेवाडी पोलिस स्थानक बेळगाव ग्रामिण मतदार संघात येत असल्याने संभाव्य गोंधळ टाळण्यासाठी त्यांना खानापूर पोलिस स्थानकात हलविण्यात आले. रात्री उशिरापर्यंत त्यांच्यावरील गुन्ह्यासंदर्भातील सोपस्कार सुरू होते.
- भाजपचा हायड्रामा
सी.टी.रवी यांना खानापूर पोलिस स्थानकात आणल्यानंतर भाजपच्या बड्या नेत्यांनी पोलिस स्थानकाबाहेर एकच गर्दी केली होती. तसेच उत्तर विभागाचे पोलिस महानिरीक्षक विकास कुमार व पोलिस अधिक्षक भीमाशंकर गुळेद यांच्यासह पोलिस अधिकारी आणि कर्मचारी परिस्थितीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करीत होते. पोलिस स्थानकात जाण्यास मज्जाव केल्याने भाजपच्या नेत्यांनी गोंधळ माजविला होता.
आमदार सी.टी.रवींचे पुढे काय झाले? रात्रभर काय घडले? Video
समांतर क्रांती / खानापूर महिला आणि बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याबद्दल अश्लिल टिप्पणी केल्याबद्दल भाजपचे आमदार सी.टी.रवी यांना अटक करण्यात आली आहे. गुरूवारी (ता.१९) रात्री त्यांना खानापूर पोलिस स्थानकात आणले होते. त्यानंतर त्यांचे काय झाले? खानापुरातून त्यांना कुठे हलविण्यात आले? विधन परिषदेत घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा गृहमंत्री अमित शहांनी अपमान केल्याबद्दल चर्चा […]