डॉ. अंजली निंबाळकर यांचा आरोप; कारवार तालुक्यात प्रचार सभा
कारवार: उज्वला योजना पूर्णपणे फोल ठरल्यामुळे भाजप-निजदने आता प्रज्वल योजना लाँच केली आहे. महिलांवरील अत्याचारात कोण आघाडीवर आहे, हेच यातून दिसून येते. भाजपच्या नेत्यांना खासदार प्रज्वल रेवण्णा यांच्या गुन्हेगारी वृत्तीची पूर्णत: माहिती असूनही खुद्द पंतप्रधान त्यांचा प्रचार करतात, यावरून भाजपची नीतीमत्ता किती घसरली आहे, हे संपूर्ण देशाने पाहीले, असे प्रतिपादन काँग्रेसच्या लोकसभा उमेदवार डॉ. अंजली निंबाळकर यांनी केले.
कारवार तालुक्यातील मुदगा, अमदळळी, बिणगा, नंदनगद्दा, सुंकेरी, कोडीबाग गावात प्रचार करण्यात आला. यावेळी त्यांनी बाजपवर टीका करतांनाच कारवारच्या विकासाला काँग्रेसशिवाय पर्याय नसल्याचे सांगितले. ३० वर्षे भाजपचे खासदार आहेत, त्यांनी मतदार संघासाठी काय केले? केवळ काँग्रेस आणि मित्रपक्षांवर आरोप करण्यापलिकडे भाजपच्या नेत्यांकडे काहीच नाही. उमेदवार विश्वेश्वर हेगडे-कागेरींनी सत्ता भोगली. पण, विकास करायला आणि जनतेच्या समस्या सोडवायला विसरले, असा टोला लगावला. #Prajwala Revanna
भाजप हा भांडवलदारांचा पक्ष आहे, तुमच्या जमिनी तुटपुंजा किमतीने खरेदी करून उद्योगपतींच्या घशात घातल्या गेल्या आहेत. कारवारमध्ये असे प्रकार मोठ्या प्रमाणात घडले आहेत. काँग्रेसने येथील जनतेला त्यांच्या अतिक्रमीत जमिनी कायमस्वरूपी त्यांना मिळवून देण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी यावेळी काँग्रेसला मतदान करा, असे आवाहन डॉ. निंबाळकर यांनी केले.
प्रसंगी बोलतांना राज्य प्रशासकीय आयोगाचे अध्यक्ष आर.व्ही.देशपांडडे यांनी भाजपच्या नेत्यांवर टीका करतांना भाजपचे नेते खोटे बोलून सत्तेत आले. त्यांनी सर्वसामान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी काहीच केले नाही. भाजपच्या काळात गरीबी वाढली, महागाईने तर कळस गाठला आहे. अशा या सरकारला घरचा रस्ता दाखवून काँग्रेसच्या उमेदवार डॉ. अंजली निंबाळकर यांना प्रचंड बहुमतांने विजयी करा, असे आवाहन केले.
डॉ. निंबाळकर यांनी कारवारमधील नागनाथ मंदीरात दर्शन घेऊन पूजा केली. तसेच बिंगा येथील चर्चमध्ये जाऊन प्रार्थना केली. यावेळी मंत्री के.जे.जॉर्ज, जिल्हा पालक मंत्री मंकाळू वैद्य,माजी मंत्री रामनाथ रै, आमदार सतिश सैल, जिल्हाध्यक्ष साई गावकर आदींसह स्थानिक कार्यकर्त्यांनी प्रचार फेरी आणि सभांमध्ये सहभाग घेतला.
खोटारड्या भाजप नेत्यांच्या नादाला लागू नका
यशवंत बिर्जेंचे हडलग्यात आवाहन; डॉ. निंबाळकरांना पाठिंबा नंदगड: स्वार्थासाठी दुसऱ्या पक्षाच्या वळचणीला गेलेले भाजपचे नेते बरळत आहेत, खोटीनाटी आमिषे दाखवत आहेत. त्यांच्या भूलतापांना बळी पडू नका. भाजपच्या केंद्रातील सरकारने गोरगरीब जनतेला भिकेला लावले. पण, कर्नाटकातील काँग्रेस सरकारने गोरगरीब जनतेला सावरले आहे. महिलांना प्रतिमहा दोन हजार रुपये दिले जात आहेत, बसप्रवास मोफत झाला आहे. वीजबिलात सवलत […]