विशेष / चेतन लक्केबैलकर
मागील ३० वर्षांचा अखंडकाळ वगळता उत्तर कन्नड (कारवार) लोकसभा मतदार संघावर काँग्रेसचा प्रभाव राहिला आहे. हा मतदार संघ काँग्रेसचा बालेकिल्ला होता. आता पुन्हा हा गड राखण्याची संधी काँग्रेसकडे आहे. डॉ. अंजली निंबाळकर यांनी त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा चालविली असल्याने त्यांना यशाची खात्री वाटते. तर भाजपने विश्वेश्वर हेगडे – कागेरी यांना उमेदवारी दिल्याने खानापूर आणि कित्तूरसह हल्याळ विधानसभा मतदार संघातून त्यांना कितपत प्रतिसाद मिळतो, हे पाहावे लागेल.
कॅनरा लोकसभा मतदार संघाचे २००८ साली उत्तर कन्नड असे नामकरण झाले. या मतदार संघावर १९५२ पासून १९९६ पर्यंत काँग्रेसची सत्ता राहिली आहे. १९९६ साली पहिल्यांदाच भाजपने मुसंडी मारली. पुन्हा १९९९ साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांत पुन्हा काँग्रेसने गड काबीज केला. मार्गारेट अल्वा या खासदार झाल्या. पण, २००४ नंतर लागोपाठ चार वेळा भाजपचे अनंतकुमार हेगडे निवडून गेले. त्यांची ३० वर्षांची कारकिर्द अगदीच सुमार राहिली. तरीही ते प्रत्येकवेळी विजयी झाले. १९९६ साली हुबळीतील इदगाह मैदान दंगल फायद्याची ठरली. २००४ आणि २००९ साली हिंदुत्वाच्या मुद्यावर तर २०१४ आणि २०१९ ची निवडणूक हेगडेंनी मोदींच्या जीवावर जिंकली.
कर्तृत्वशुन्य आणि विकासाच्या बाबतीत सपशेल अपयशी ठरलेले अनंतकुमार हेगडे पुन्हा यावेळी आखाड्यात उतरण्यास तयार होते. पण, मतदारसंघातील नाराजी पाहून पक्षानेच त्यांना नारळ देत घरी बसविले. तरीही भाजपविरोधातील नाराजी कमी झालेली नाही. कारण, भाजप व हेगडेंनी ३० वर्षे जनतेची फसवणूक केली आहे. त्यामुळे साहजिकच मतदारांना बदल हवा आहे. परिणामी, सध्या काँग्रेसचे वारे वादळ बनून वाहू लागले आहे. पुन्हा कारवार लोकसभेचा गड काबीज करण्यासाठी काँग्रेसच्या जुन्या जाणत्या नेत्यांसह तरूणांनी कंबर कसली आहे. त्यामुळे काँग्रेसला कारवारचा गड पुन्हा हस्तगत करणे अवघड नाही. BJP stronghold; not difficult to Congress.
डॉ. निंबाळकर यांचे बलस्थान काय आहे?
दांडगा जनसंपर्क आणि निर्णयक्षता यामुळे डॉ. निंबाळकर मतदारांवर छाप पाडतात. नेतृत्वगुणामुळे पक्ष कार्यकर्त्यांत त्यांच्याबद्दल आदर आहे. २०१८ साली खानापूरच्या आमदार राहिल्या असल्याने तालक्यातील मतदान मोठ्या प्रमाणात त्यांना मिळेल. कित्तूर, हल्याळ, कारवार, भटकळ, शिरसी या पाच मतदार संघावर काँग्रेसची सत्ता असल्याचा थेट फायदा होणार. शिवाय विवेक हेब्बार काँग्रेसवासी झाल्याने यल्लापूरमधूनही त्यांना भाजपच्या तुलनेत अधिक मते मिळतील. काँग्रेसच्या पाच गॅरंटींचा सर्वाधिक फायदा किनारपट्टीवरील जनतेला होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पक्षाला अधिक मतदान होईल, अशी काँग्रेसची आशा आहे. त्याचा प्रत्यय प्रचारसभांमधून येत आहे. आतापर्यंतच्या बहुतेक निवडणुकांत उमेदवारांची मदार ही खानापूर, कित्तूर आणि हल्याळ मतदार संघावर राहिली आहे. या तिन्ही मतदार संघावर डॉ. निंबाळकर यांचा प्रभाव आहे. त्याशिवाय भटकळ आणि कारवारमध्येही त्या हेगडे-कागेरींना मात देऊ शकतात. समितीचा उमेदवार रिंगणात असतांनाही मराठी भाषिकांकडून मिळणारा पाठींबा डॉ. निंबळकर यांना विजयापर्यंत पोहचवेल, असा आशावाद व्यक्त केला जात आहे.
- असा आहे प्रभाव..
- हल्याळ- आर.व्ही.देशपांडे (माजी मंत्री)
- कित्तूर- बाबासाहेब पाटील
- कारवार- सतिश सैल
- भटकळ- एम.एस.वैद्य
- शिरसी- भिमान्ना नाईक
विश्वेश्वर हेगडे- कागेरींचे बलस्थान काय आहे?
प्रत्येकी तीन वेळा अंकोला आणि शिरसी विधानसभा मतदार संघातून आमदार झालेले विश्वेश्वर हेगडे – कागेरी यांचा शिरसी मतदार संघात प्रभाव आहे. त्याशिवाय आठपैकी तीन मतदार संघावर भाजपची सत्ता आहे. खानापूरमध्ये भाजपची सत्ता असली तरी पक्षीय प्रभाव नाही. कुमठा आणि यल्लापूरमध्ये त्यांना चांगले मताधिक्य मिळेल, पण तेथील भाजप नेत्यांची नाराजी दूर करण्याची गरज आहे. खासदार अनंतकुमार हेगडे आणि आमदार शिवराम हेब्बार हे नाराज असल्याचा फटका भाजपला बसेल. भाजपला खिंडार पडले आहे. आभाळ फाटल्यासारखी स्थिती असल्याने प्रचार काळात ठिगळं लावण्यातच कागेरी आणि भाजपच्या जेष्ठ नेत्यांचा वेळ वाया जाणार आहे.शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख असणारे कागेरी यांनी शिक्षण मत्री आणि सभापती म्हणून सेवा बजावली असली तरी विकासात्मक आलेख तोकडा असल्याने त्यांना लोकसभेच्या निवडणुकीत लोकश्रय मिळणे कठीणच. शिक्षणमंत्री म्हणून त्यांनी राबविलेले भाषा धोरण मराठी आणि कोंकणीला मारक ठरणारे होते. तसेच त्यांनी मराठीबाबत केलेली बेताल वक्तव्ये अद्यापही सीमावासीयांच्या विस्मरणात गेलेली नाहीत. त्याचा परिणाम किमान खानापूरात तरी नक्कीच होणार, असे राजकीय समिक्षकांचे मत आहे.
हेही वाचा..
- असा आहे प्रभाव..
- खानापूर- विठ्ठल हलगेकर
- कुमठा- दिनकर शेट्टी
- यल्लापूर- शिवराम हेब्बार (यांचा मुलगा काँग्रेसवासी होऊन डॉ. अंजली निंबाळकर यांचा प्रचार करीत आहे.)
निरंजन सरदेसाईंचे बलस्थान काय?
खानापूर म.ए.समितीचे तरूण कार्याध्यक्ष निरंजन सरदेसाई यांना उमेदवारी देण्यात आली असून त्यांनी त्यांचा अर्ज दाखल केला आहे. निरंजन सरदेसाई यांचे काका खानापूर तालुक्याचे तीनवेळा आमदार राहिले आहेत. दिवंगत निळकठराव सरदेसाई यांनी तालुक्यात पहिला साखर कारखाना स्थापन केला. अलिकडच्या काळात गेल्या चार वर्षांपासून निरंजन सरदेसाई समितीच्या प्रवाहात सहभागी झाले असून सुरूवातीपासूनच त्यांचा वारू उधळला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत ते समितीकडून इच्छूक होते. त्यांच्या समर्थकांनी त्यांच्यासाठी मोहीम उघडली होती. पण, त्यांचा तग लागला नाही. आता मराठी अस्मितेसाठी लोकसभेची लढत लढण्यासाठी ते रिंगणात आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत समितीला केवळ ९ हजार मतावर निराशाजनक समाधान मानावे लागले होते. यापूर्वी कधीच समितीने लोकसभेची निवडणूक लढविली नव्हती. यंदाचा हा नवा प्रयोग असल्याने त्याचा म्हणावा तसा फायदा होण्याबाबत शंका आहेत.व्यक्ती म्हणून निरंजन सरदेसाईंना जेवढी मते मिळतील, त्याहून अधिक समितीचे उमेदवार म्हणून घटतील, अशी सद्यस्थिती आहे. विधानसभेच्या निवडणुकीनंतर मराठी भाषिकांवर अन्याय करणारे अनेक निर्णय झाले, त्याविरोधात आवाज न उठविणारे समितीवाले आताच कसे जागे झाले, असा प्रश्न विचारला जात आहे. त्याचा फटका समितीला बसेल. खानापूरवगळता इतर कोणतेच विधानसभा मतदार संघ समितीच्या आवाक्यात नाहीत.
- असा आहे प्रभाव..
- प्रभाव पडेल असे कोणतेच प्रतिनिधीत्व सद्या समितीकडे नाही. स्वराज्य संस्थाही समितीच्या हातात नाहीत.
डॉ. अंजली निंबाळकर यांचे लक्षवेधी शक्तीप्रदर्शन; अवघे कारवार भगवेमय
उमेदवारी अर्ज दाखल; ‘कारवार’मधून भाजपला हद्दपार करण्याचा निर्धार कारवार: काँग्रेसच्या उमेदवार डॉ. अंजली निंबाळकर यांनी आज मंगळवारी (ता.१६) येथील जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक अधिकाऱ्यांकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हा पालक मंत्री ममकाळू वैद्य, माजी मंत्री आर.व्ही.देशपांडे, आमदार भिमान्ना नाईक, आमदार बाबासाहेब पाटील आमदार सतिश सैल उपस्थित होते. अर्ज दाखल करण्यापूर्वी डॉ. निंबाळकर यांनी नेत्यांसमवेत […]