समांतर क्रांती वृत्त
नंदगड: शिपेवाडी आणि करंजाळ येथे आज गुरूवारी घरफोड्या केल्याच्या घटना उघडकीस आल्या. त्यामुळे नंदगड पोलीसांची अक्षरश: झोप उडाली आहे. तीन ठिकाणी चोरी झाली असून यात पाच तोळे सोन्याचे दागिण्यासह चांदी आणि रोकड लंपास करण्यात आली आहे.
याबाबत नंदगड पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी, शिंपेवाडी येथील सुरेश जयराम पाटील हे त्यांच्या कुटुंबीयांसमवेत शिवारात कामाला गेले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचा समोरील दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. तेथून चार तोळे सोने, २५ तोळे चांदीचे दागिणे आणि १४ हजारांची रोकड चोरट्यांनी पळविली. याच दरम्यान करंजाळ येथील परशराम गणेश लक्केबैलकर यांच्या घरातही चोरी झाली असून त्यांच्या घरातून एक तोळे सोने, ५ तोळे चांदी आणि चार हजारांची रोकड लंपास करण्यात आली आहे. म्हात्रू गणेश लक्केबैलकर यांच्या घरातही चोरीचा प्रयत्न झाला आहे.
याबाबत नंदगड पोलिसांत तक्रारी दाखल झाल्या असून श्वान पथकाच्या मदतीने चोरांचा माग काढण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. परंतू, त्यात यश आले नाही. चोरांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
खानापूरमधून ‘या’देखील आहेत ‘खासदारकी’च्या रेसमध्ये!
समांतर क्रांती वृत्त खानापूर: २०२४ च्या लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. त्यामुळे साहजिकच उमेदवार निवडीचा पेचप्रसंग भाजप आणि काँग्रेससमोर आहे. कॅनरा लोकसभा मतदार संघातून सध्याचे खासदार अनंतरकुमार हेगडे यांनी ‘निवृत्ती’ घेण्याची घोषणा केली असल्याने नव्या उमेदवाराच्या शोधाला गती आली आहे. माजी आमदार अरविंद पाटील, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांच्यानंतर आता भाजपच्या राज्य कार्यकारीणी सदस्य […]