समांतर क्रांती ब्युरो
कर्नाटक सरकारच्या महिलांना फुकटात बस प्रवासाच्या योजनेमुळे सध्या अनेक गमती-जमती घडत आहेत. बायकांच्या माहेरच्या फेऱ्या वाढल्याने नवरे तर त्रस्त आहेत, माहेरचे लोकही हैराण आहेत. राज्यातील मंदिरातील महिलांची गर्दी वाढल्याने मंदिर प्रशासन हवालदिल आहेत. हे सगळं स्वाभावीक होतं, पण त्याव्यतिरिक्त अनेक गमती-जमती या मोफत बसप्रवासामुळे घडत आहेत. एका महिलेच्या अशाच बस प्रवासामुळे खानापूर पोलिसांची मात्र पुरती धावपळ उडाल्याची घटना मंगळवारी घडली.
तालुक्यातील गर्लगुंजी गावातील एक महिला नवरा आणि सासूशी वाद झाल्याने तान्हुल्याला काखोटीला मारून घराबाहेर पडली. काय करावं सूचेना म्हणून ती बसमध्ये चढली. खानापूरला येऊन पुन्हा धारवाडला जाणाऱ्या बसमध्ये बसली. प्रवास मोफत असल्याने तिकीट खर्चाची चिंता नव्हती. ती हल्याळ बसस्थानकावर उतरली. दुपार झाली होती. पोटात भुकेचे कावळे ओरडत होते. बाळही आकांत करू लागलं होतं. प्रवास फुटकचा झाला पण प्रश्न पोटातल्या आगीचा होता.
तिची आवस्था पाहून प्रवाश्यांनी तिची चौकशी केली असता, रागाच्या भरात तिने केलेल्या फुकटच्या उचापतीची कहाणी कळली. तात्काळ याची माहिती स्थानिक पोलीसांना देण्यात आली. तेथील पोलीसांनी खानापूर पोलीसांना याची माहिती दिली. त्यानंतर येथील पोलीसांची धावपळ सुरू झाली. हल्याळला पोलीस कर्मचाऱ्यांना पाठवून त्या महिलेला तान्हुल्यासह सुखरूप खानापूरला आणून नंतर तिला कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले. या घटनेमुळे पोलीसांना हसावे की रडावे, तेच कळेनासे झाले. तिच आवस्था तिच्या कुटुंबीयांचीही झाली होती.
एकंदर, फुकटच्या बस प्रवासामुळे असे अनेक प्रसंग समोर येत असून त्यातून जेवढे विनोद होत आहेत, तेवढीच ही योजना गंभीर बनत चालली आहे, असे पोलीसांनी सांगितले. तूर्तास पोलीसांनी ‘कारभाऱ्यांनो, जरा दमानं घ्या!’ इतकाच सल्ला दिला आहे.
अस्वलाचा हल्ला: रक्तबंबाळ आवस्थेत ‘तो’ एक कि.मी.चालला
खानापूर: अस्वलाने अचानक हल्ला करून जखमी केल्यानंतरही रक्तबंबाळ आवस्थेत एक कि.मी.चालत जाऊन घर गाठून जीव वाचविल्याची घटना बुधवारी रामनगर (ता.जोयडा) जवळील तिंबोली येथे घडली. या घटनेत विष्णू तानाजी शेळके (वय ७२, रा. म्हाळुंगे, ता.चंदगड) असे या जखमी गवळ्याचे नाव असून त्याच्यावर बेळगाव येथील इस्पितळात उपचार सुरू आहेत. याबाबतची अधिक माहिती अशी, विष्णू हे त्यांच्या नातवाला […]