Bus travel will become more expensive; there will be a 15 percent increase
बेळगाव: शक्ती योजनेंतर्गत महिलांना बस प्रवास मोफत असला तरी इतरांसाठी बस प्रवास महागणार आहे. यासंबंधीचा प्रस्ताव परिवहन मंडळाने सरकारकडे पाठविला आहे. सध्याच्या दरात १५ टक्के वाढ करण्याची आवश्यकता या प्रस्तावात व्यक्त करण्यात आली आहे. गेल्या पाच वर्षांपासून बस तिकीट वाढविले नसल्याचे परिवहन मंडळाने म्हटले आहे. प्रत्यक्षात मात्र शक्ती योजना लागू केल्यानंतर कांही दिवसांतच तिकीट दरवाढ करण्यात आली होती.आता पुन्हा १५ टक्क्यांची वाढ केल्यास प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे. इंधन दरवाढीमुळे पविहन मंडळ तोट्यात असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
खानापूरच्या अर्बन बँकेत धूमशान; संचालकातच नाही एकमत..
समांतर क्रांती / खानापूर येथील अर्बन बँक म्हणून परिचीत असलेल्या खानापूर को-ऑप. बॅंकेची पंचवार्षिक निवडणूक रविवार दि. १२ रोजी होणार आहे. त्यासाठी विद्यमान संचालकांतच एकवाक्यता नसल्याने ही निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. विशेष म्हणजे विद्यमान संचालक मंडळातील कांही संचालक दुसऱ्या पॅनेलमधून निवडणूक लढणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान, शनिवारी (ता.४) अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असून त्यानंतरच […]