समांतर क्रांती / खानापूर
महिला आणि बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याबद्दल अश्लिल टिप्पणी केल्याबद्दल भाजपचे आमदार सी.टी.रवी यांना अटक करण्यात आली आहे. गुरूवारी (ता.१९) रात्री त्यांना खानापूर पोलिस स्थानकात आणले होते. त्यानंतर त्यांचे काय झाले? खानापुरातून त्यांना कुठे हलविण्यात आले?
विधन परिषदेत घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा गृहमंत्री अमित शहांनी अपमान केल्याबद्दल चर्चा सुरू होती. यावेळी आमदार सी.टी.रवी यांनी मंत्री हेब्बाळकर यांच्याबद्दल अश्लिल टिप्पणी केली. त्यावरून परिषदेत कांही काळ गोंधळ माजला. त्यानंतर आमदार सी.टी.रवी सभागृहातून बाहेर येताच मंत्री हेब्बाळकर यांच्या समर्थकांनी त्यांना घेराव घातला.
दरम्यान, हिरेबागेवाडी पोलिस स्थानकात सायंकाळी गुन्हा दाखल झाल्यानंतर आमदार सी.टी.रवी यांना हिरेबागेवाडी पोलिसांनी अटक केली. हिरेबागेवाडी पोलिस स्थानक मंत्री हेब्बाळकर यांच्या ग्रामिण मतदार संघात येत असल्याने कायदा आणि सुव्यवस्थेच्या कारणास्तव आमदार रवी यांना खानापूर पोलिस स्थानकात हलविण्यात आले. यावेळी पोलिस स्थानक आणि परिसरात उत्तर विभागाचे पोलिस महासंचालक विकास कुमार, बेळगावचे पोलिस आयुक्त याडा मार्टीन म्यार्बयांग, पोलिस अधिक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांच्यासह अन्य पाच पोलिस अधिक्षक, इतर अधिकारी आणि मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
खानापूर पोलिस स्थानकात आमदार रवी यांना भेटण्यास मज्जाव करण्यात आल्याने रात्री उशिरापर्यंत तणावग्रस्त स्थिती होती. वकिलांना सुध्दा त्यांची भेट घेण्यास मनाई करण्यात आली. विरोधी पक्षनेते व माजी उपमुख्यमंत्री आर. अशोक यांनाही अडविण्यात आले. सरकार द्वेष भावनेतून रवी यांच्यवर अन्याय करीत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. रात्री उशिरा आमदार रवी यांना बेंगळूरला हलविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले होते.
रात्री उशिरा त्यांना पोलिस स्थानकातून धारवाडला घेऊन गेले. तेथून पुन्हा कित्तूरला आणून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर तेथून त्यांना रामदूर्ग नेऊन पुन्हा पहाटे बेळगावला हलविण्यात आले आहे. आज शुक्रवारी (ता.२०) त्यांना न्यायालयात हजर केले जाईल. एकंदर, या प्रकरणावरून राज्यातील राजकारण पेटणार आहे.
भाजप आमदार सी.टी.रवींचा पाय आणखी खोलात..
बंगळूर: महिला आणि बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याबद्दल अश्लिल वक्तव्य केल्याप्रकरणी अटकेत असलेले भाजप आमदार सी. टी. रवी आणखी एका संकाटात सापडले आहेत. या प्रकरणात आता राज्य महिला आयोगाने एन्ट्री मारली असून आज नोटीस बजावली जाण्याची शक्यता आहे. याबाबत ‘न्यूज १८ कन्नड’ला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा नागलक्ष्मी यांनी माहिती दिली. एक मंत्री म्हणून नाही […]