समांतर क्रांती
खानापूर: दहा बाय दहाचे चहाचे दुकान. त्यात दोघांना बसता येईल, असे विसेक गाळे. एरवी, स्मशान शांतता असणाऱ्या या दुकानात कॉलेज सुटले की जणू किलबिलाट सुरू होते. नेमके या कॅफेंमध्ये दडलंय काय? असा प्रश्न सर्रास सगळ्यांनाच पडतो. पण, त्याकडे लक्ष देतंय कोण? या कॅफेंमध्ये काय दडलंय, याचा खुलासा शुक्रवारी झाला.
शहरात तीन-चार अशी चहाची दुकानं आहेत, ज्यामध्ये कॉलेज तरूण-तरूणींशिवाय दुसरे कुणीच चहा पित नाही. हे खोटे वाटेल. पण, वास्तव आहे. त्याचे कारणही तसेच आहे. दहा बाय दहा फुटाच्या दुकानात केवळ दोघेजण कसेबसे बसतील इतके लहान गाळे करून तेथे प्रेमीयुगुलांना बसण्याची सोय करून दिली गेली आहे. चहा दहा रुपयांना मिळत असला तरी तेथे बसण्याचे ‘चार्जिस’ मात्र अव्वाच्या सव्वा आहेत. एकांत मिळावा म्हणून कॉलेजचे तरूण-तरूणी या ठिकाणी येतात. एरवी, या चहाच्या दुकानाकडे कुणी ढुंकूनही पाहत नाही. परंतु, कॉलेज सुटले की, दुकानात तोबा गर्दी व्हायला सुरूवात होते.
चहा पिणे आणि आपल्या मित्र-मैत्रिणीशी गप्पा मारणे. प्रियकर-प्रियतमेशी गुजगोष्टी करीत बसणे यात चुकीचे कांहीच नाही. त्याही पुढे जाऊन या कॅफेंमध्ये नको तेच घडायला लागल्याची चर्चा शहरात सुरू आहे. याबाबत पोलिसांकडे तक्रार करण्यात आल्यानंतर शुक्रवारी स्टेट बँकेशेजारील एका कॅफेवर पोलिसांनी छापा मारला. यावेळी सुमारे विसेक जोडपी कॅफेमध्ये आढळली. त्यांना पोलिसांनी हुसकावून लावले. तर कॅफे मालकाला समजूतीच्या ‘चार’ गोष्टी सांगून सोडून देण्यात आले. कॅफेतील छोटे गाळे काढून टाकण्याचा ‘सज्जड’ त्याला देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
एकंदर, या कॅफेमध्ये कांही तरी दडलंय, हे नक्की. प्रमालापाच्या आडून ‘नको ते’ प्रकार घडत असल्याचे मत यादरम्यान व्यक्त होत आहे. तर आम्ही जाऊ तरी कुठे असा तरूण-तरूणींचा प्रश्न आहे. यावर पोलिस मात्र हतबल झाले आहेत. आता तेही म्हणताहेत.. आम्ही काय करू?
असले कसले पुत्रप्रेम; खानापुरात बापानेच केला मुलाचा खून
समांतर क्रांती वृत्त खानापूर: बापाने मतिमंद मुलाचा विष पाजून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. मुलगा मतिमंद आहे, त्यामुळे धाकट्या मुलाचे लग्न जमणार नाही, या विवंचनेतून बापाने मतिमंद मुलाला विष पाजून संपविले. एका मुलाचे भवितव्य घडवू पाहणाऱ्या बापाने दुसऱ्या मुलाचा निर्घूणपणे खून करावा, ही अजब घटना खानापूर येथील मलप्रभा नदीकाठावर ३० मे रोजी घडली. या […]