- शिरसी : मंगळसूत्र मुस्लिमांना देण्याबाबत वक्तव्य करून पंतप्रधानांनी इतक्या खालच्या पातळीवर जाऊ नये. त्यांना देशाची संस्कृती माहीत असायला हवी. मंगळसूत्र-दागीणे लुटणे ही काँग्रेसची संस्कृती नाही. काँग्रेसने राज्यात ‘ताळीभाग्य’ योजना आणून गरिब-वंचीत कुटुंबातील लग्नांसाठी आर्थिक तरतूद केली. रेल्वे, विमानतळ, गॅस लाईन, रस्ते हे सर्व काँग्रेसने भारत मातेला दागिने म्हणून दिले होते. पण भाजपने ते विकले आहे. आईचे दागिने उद्योगपतींना विकणाऱ्या भाजपकडून देशाच्या रक्षणाची अपेक्षा करता येईल का? असा सवाल मंत्री एच.के.पाटील यांनी केला.
हुलेकल जि.पं. काँग्रेसच्या व्यापक प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी काँग्रेसच्या उमेदवार डॉ. अंजली निंबाळकर यांना प्रचंड बहुमतांनी निवडून देण्याची जबाबदारी उत्तर कर्नाटकातील जनतेने उचलली असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. Can we expect protection of the country from those who sell mother’s jewelery to industrialists?
पुढे बोलतांना मंत्री पाटील यांनी मोदींवर सडकून टीका केली. ते म्हणाले, काँग्रेसच्या गॅरंटीवर मोदी आणि भाजपचे नेते टीका करीत होते. पण, तेच आता आमच्या अश्वासनांची कॉपी करीत आहेत. कर्नाटकात गॅरंटींची पुर्तता केल्यामुळे राज्यातील महिला, तरूण, शेतकरी, कष्टकरी जनता आमच्या काँग्रेस पक्षाला भरभरून आशिर्वाद देत आहे. आताही गॅरंटीमुळेच भाजपचे सरकार उलथणार असून मोदींचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे ते विकासावर बोलण्याऐवजी कांहीही बरळत आहेत.
संविधानाचे मूल्य आणि लोकशाहीच्या अस्तित्वावर सध्या प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. मागील निवडणुका आणि यावेळच्या निवडणुकांमध्ये मोठा फरक आहे. लोकशाही टिकण्याचा प्रश्न या निवडणुकीत आहे. भाजप जिंकला तर संविधान टिकू शकणार नाही. जनतेच्या जगण्याचा प्रश्नही या निवडणुकीत असल्याचे सांगून मंत्री पाटील यांनी, शेतकऱ्यांचे उत्पन्न कमी आणि खर्च दुप्पट झाला आहे. तरुणांसाठी वार्षिक दोन कोटी रोजगार निर्माण करणार असल्याची ओरड ते करत असत. दहा वर्षांपासून खोटे बोलणारे आणि फसवणूक करणारे सरकार कोणत्या नावाखाली मते मागायला येत आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.
- राज्य प्रशासकीय सुधारणा आयोगाचे अध्यक्ष आर.व्ही.देशपांडे म्हणाले की, राज्याची हमी योजना मनाला भिडली आहे. त्यासाठी आता खुद्द मोदींनीच ही कॉपी करण्यास सुरूवात केली आहे. काँग्रेस सरकारच्या हमी योजनेचा लाभ घेतलेल्या सर्वांनी काँग्रेसला मतदान केल्यास डॉ.अंजली निंबाळकर यांचा विजय निश्चित असल्याचे त्यांनी सांगितले.
शिरसीचे आमदार भीमण्णा नायक यांनी, गरीब अतिक्रमणधारकांना जमिनीचे हक्क देण्याची भाजपची इच्छाशक्ती नाही. कस्तुरीरंगन अहवालासह जिल्ह्यातील प्रमुख समस्या सोडविण्यासाठी केंद्रात काँग्रेसचे सरकार आले पाहिजे. त्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी उमेदवार असल्याप्रमाणे प्रचार करून डॉ.अंजली निंबाळकर यांना विजयी करावे, असे आवाहन त्यांनी केले.
- श्रीराम-छ.शिवाजी महाराजांना राजकारणात आणून हिंदू-मुस्लिम करीत तरुणांची दिशाभूल करणे हे भाजपचे काम असल्याचे उत्तर कन्नड लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार डॉ.अंजली निंबाळकर यांनी सांगितले. लोकांची सेवा करण्यासाठी आम्ही मते मागत आहोत. निवडून आलेले खासदार 30 वर्षांपासून मतदारसंघातील जनतेबद्दल बोलत नाहीत. त्यामुळे यावेळी बदल होणारच, असे त्या म्हणाल्या.
ग्रा.पं.चे माजी सदस्य एन.हेगडे मुरेगर यांनी वनहक्क कायद्यात सुधारणा करण्यासाठी केंद्रात काँग्रेसचे सरकार यावे. त्यासाठी डॉ.अंजली निंबाळकर यांची निवड करून संसदेत पाठवावे, असे ते म्हणाले.
यावेळी काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष साई गावकर, ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष जगदीश गौद्रू, शिक्षक संघाचे प्रदेशाध्यक्ष बसवराज गुरिकरा, युवक काँग्रेसचे अध्यक्ष संतोष शेट्टी, प्रचार समितीचे अध्यक्ष व्यंकटेश हेगडे होसाबळे, यल्लापूर प्रचार समितीचे अध्यक्ष सी.बी.गौडा, ग्रा.पं.चे माजी सदस्य जी.एन. हेगडे, ज्योती पाटील, श्रीनिवास नायका, हुलीकल गावचे अध्यक्ष कासिम साब आदी उपस्थित होते.
जाती-धर्मावरून आग लावण्याचे धंदे बंद करा : डॉ. निंबाळकरांनी कागेरीना झापले
मेस्ता मृत्यू प्रकरणावरून डॉ. निंबाळकर कडडल्या: दंगलीना कागेरीच जबाबदार कारवार: परेश मेस्ता या तरुणाच्या मृत्यूचे राजकारण करून तुम्ही आमदारकी मिळवली.तुम्ही गरिबांची घरे, दुकाने, सरकारी मालमत्ता जाळली. यात अनेक निष्पाप तरुण होरपळले, त्यांचे संसार उध्वस्त झाले. त्यावेळी तुम्ही मैदान सोडून पळाला. आता हे आगी लावण्याचे धंदे बंद करा, अशा शब्दात काँग्रेसच्या उमेदवार डॉ. अंजली निंबाळकर यांनी […]