समांतर क्रांती वृत्त
खानापूर: २०२४ च्या लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. त्यामुळे साहजिकच उमेदवार निवडीचा पेचप्रसंग भाजप आणि काँग्रेससमोर आहे. कॅनरा लोकसभा मतदार संघातून सध्याचे खासदार अनंतरकुमार हेगडे यांनी ‘निवृत्ती’ घेण्याची घोषणा केली असल्याने नव्या उमेदवाराच्या शोधाला गती आली आहे. माजी आमदार अरविंद पाटील, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांच्यानंतर आता भाजपच्या राज्य कार्यकारीणी सदस्य धनश्री सरदेसाई जांबोटीकर यांच्या नावाची चर्चाही सुरू झाली आहे. त्यांनी अद्याप या वृत्ताला दुजोरा दिला नसला तरी त्या अनुषंगाने त्यांचे प्रयत्न सुरू असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. कुणाला उमेदवारी मिळणार? हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
खानापूर आणि कित्तूर हे बेळगाव जिल्ह्यातील दोन तालुके कॅनरा लोकसभा मतदार संघात येतात. याच दोन तालुक्यांच्या जीवावर आजवर भाजपची मदार राहिली आहे. पण, या तालुक्यातून एकदाही कुणाला उमेदवारी देण्यात आलेली नाही. त्यामुळे जर खासदार अनंतकुमार हेगडे ‘एक्झीट’ घेणार असतील तर आम्हाला उमेदवारी द्या, अशी मागणी जोर धरू लागली आहे. त्यात माजी आमदार अरविंद पाटील आघाडीवर आहेतच, पण नुकताच प्रमोद कोचेरी यांनीही थेट अनंतकुमार हेगडेंची भेट घेऊन त्यांची सुप्त इच्छा व्यक्त केली आहे. प्रमोद कोचेरी यांच्या म्हणण्यानुसार खा.हेगडेंनी त्यांना हिरवा कंदिल दाखविला आहे. अशातच आता भाजपच्या राज्य कार्यकारिणी सदस्या असलेल्या धनश्री सरदेसाई जांबोटीकर या धासदारकीप्रयत्नशील असल्याचे वृत्त आहे.
धनश्री सरदेसाई जांबोटीकर यांनी यावेळच्या विधानसभा निवडणुकीत तिकिट मिळविण्यासाठी पराकाष्टा केली होती. केंद्रीय समितीच्या यादीत त्यांचे नाव आग्रक्रमावर होते, पण ऐनवेळी त्यांना नारळ मिळाला. त्या राज्य कार्यकारिणी सचीव, सदस्य आणि भाजपच्या विविध समित्यांवर कार्यरत आहेत. त्याशिवाय त्यांचे सामाजिक कार्यही प्रशंसनीय आहे. त्यामुळे त्यांची दखल घेतली जाणार का? याकडे भाजपेयी नेत्यांचे लक्ष लागले आहे. त्यांनी स्वत: मात्र याबाबत वाच्यता करणे टाळले असले तरी पक्षश्रेष्ठींकडून त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.
अलिकडेच प्रमोद कोचेरी यांनी खा. हेगडे यांची भेट घेतल्यानंतर हेगडेंनी राजकीय निवृत्तीचे सुतोवाच्च केल्याचे कोचेरी यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे कॅनरा मतदार संघातून भाजपचा उमेदवार कोण? असा प्रश्न उढे आला आहे. यावेळी उमेदवारी खानापूर तालुक्यालाच मिळावी, अशी रास्त मागणी होत असतांना माजी आमदार अरविंद पाटील, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी आणि राज्य कार्यकारिणी सदस्या धनश्री सरदेसाई जांबोटीकर यांची नावे समोर येत आहेत. केवळ कांहीच कारणांनी विधानसभेची उमेदवारी हुकलेल्या सौ. सरदेसाई यांना लोकसभेची उमेदवारी मिळू शकते, असा कयास आहे. त्यामुळे खानापूर तालुका भाजपच्या गोटात उत्सूकता लागून राहिली आहे.
अरे वाह! काय शक्कल? तरीही पकडली २७ लाखांची दारू
समांतर क्रांती वृत्त खानापूर: ट्रकमध्ये कप्पे करून त्यातून गोवा बनावटीची दारू वाहतूक करणारा २५ लाखांचा ट्रक आणि २७ लाखांच्या दारूसह दोघांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई कणकुंबीजवळ करण्यात आली. विशेष म्हणजे ट्रकमधील कप्पे तोडण्यासाठी चक्क जेसीबीचा वापर करावा लागला. चोर कितीही शिरजोर असला तरी तो कधी ना कधी सापडतोच. या आश्चर्यजनक घटनेची तालुकाभर चर्चा […]