विशेष संपादकीय
सत्तापिपासू भाजपाने रान उठवल्याच्या काळात इंडिया आघाडीने दंड थोपटले आहेत. अशा काळात कारवार लोकसभा मतदार संघातून माजी केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडेंना भाजपने नारळ दिला. राज्याचे अनेक वर्षे मंत्री आणि विधान परिषदेचे सभापतीपदी राहिलेले विश्वेश्वर हेगडे-कागेरी यांना भाजपने उमेदवारी दिली. काँग्रेसने खानापूरच्या माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांना उमेदवारी देत कारवार (कॅनरा) लोकसभेचा गड पुन्हा एकदा सर करण्याचा चंग बांधला आहे. तर मराठीच्या संरक्षणाचा आव आणत पहिल्यांदाच महाराष्ट्र एकीकरण समितीनेदेखील उमेदवार जाहीर केला आहे. खानापूर समितीचे कार्याध्यक्ष निरंजन सरदेसाई यांना उमेदवारी देण्यात आली आहे. खानापूर तालुक्यातील दोन उमेदवार या निवडणुकीत आहेत. तर शिरसीचे कागेरी बाजपकडून आहेत. प्रत्यक्षात लढत दुरंगीच होणार यात वाद नाही. तरीही खानापूर तालुक्यातील मतांचे विभाजन शक्य आहे. सद्यस्थिती पाहता डॉ. अंजली निंबाळकर यांच्या माध्यमातून काँग्रेसने भाजप-निजद युतीला जोर का झटका और जोरसे दिला आहे. मुदलात, कारवार लोकसभा मतदार संघ हा काँग्रेसचाच बालेकिल्ला. किनारपटट्टी ते घाटमाथा आणि मराठी, कानडी ते कोकणी या भाषांची रेलचेल. एकुण विधानसभा मतदार संघापैकी खानापूर, हल्याळ आणि कित्तूर हे मतदार संघ घाटमाथ्यावरचे. त्यामुळे प्रादेशिक असलगताही आहेच. पण, सांस्कृतिक बदलही पहायला मिळतात. किनारपट्टीचा प्रदेश कमालीचा देवभोळा असतांनाही भाजपला यापूर्वी कधीच त्या भागात थारा मिळाला नव्हता. त्यामुळे साहजिकच खासदार अनंतकुमार हेगडेंची मदार ही कायम खानापूर आणि कित्तूरवर राहिली. ती त्यापूर्वीही होतीच. म.ए.समितीचे तत्कालीन आमदार पी.बी.कदम यांनी काँग्रेस प्रवेश करून लोकसभेची निवडणूक लढविली. त्यावेळीही त्यांनी केवळ खानापूर आणि जोयड्याच्या जीवावर त्यावेळचे मातब्बर नेते, जे राज्याचे मुख्यमंत्री रामकृष्ण हेगडे यांना सपशेल धूळ चारली होती. त्यानंतर माजी खासदार मार्गारेट अल्वा यांनाही खानापूरकरांनीच खासदारकीचा मान मिळवून दिला. त्याची जाण ठेवत त्यांनी खानापूर तालुक्याला आमदारांनतरही खासदार म्हणून कुणी असतो, याची ओळख करून दिली. त्यांनी अनेक विकास कामे तालुक्यात राबविली. त्यांचा तालुक्यावर विशेष जीव होता. पण, दुर्दैवाने त्यांना पुन्हा संधी मिळाली नाही. स्वकीयांच्या हरामखोरीचा तो परिपाक होता. त्यांच्यानंतर हुबळीतील इदगाह मैदान प्रकरणाचा प्रभाव या लोकसभा मतदार संघावर अधिक पडला. त्यामुळे भाजपचे फावले. अनंतकुमार हेगडे यांना ततब्बल सहा वेळा संधी मिळाली. पण, त्यांनी खानापूर-कित्तूरसाठी सोडाच, त्याच्या स्वत:च्या शिरशीसाठीही काडीचे योगदान दिले नाही. केवळ बोलबच्चनगिरी करीत त्यांनी संसदेतील खर्ची गरम करण्यात ३० वर्षे वाया घालविली. त्यात खानापूरकरांचा मुर्खपणा आणि भाजपवाल्यांचा बेमुवर्तपणा नडला. खासदारांना आमदारांना मिळतो, त्यातील निम्मादेखील विकास निधी मिळत नाही. तरीही त्यांच्याकडून लोकहिताचे अनेक महत्वाकांक्षी निर्णय घेतले जाऊ शकतात, याची कल्पनाच खासदाराला नसवी, यासारखा दैवदुर्विलास नाही. उशिरा का होईना भाजपच्या नेत्यांना शहाणपणा सुचला आणि खा.हेगडेंना नारळ देण्यात आला. आता खरी कसोटी या मतदार संघातील मराठी भाषक आणि मराठा समाजाची आहे. विशेषत: खानापूर तालुकावासीयांना ही सोनेरी संधी आहे. विश्वेश्वर हेगडे-कागेरी यांनी मराठी भाषा आणि मराठा समाजाबद्दल यापूर्वी अनेकवेळा अकलचे तारे तोडले आहेत. त्याची जाणीव प्रत्येकाला असायला हवी. त्यांना या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व दिल्यास ते अनंतकुमार हेगडे यांच्याच पावलावर पाऊल ठेवणार नाहीत, याची खात्री स्थानिक भाजप नेतेही देऊ शकत नाहीत. त्यामुळे खानापूरकरांसमोर दोन पर्याय आहेत. एक काँग्रेस आणि दुसरा म.ए.समिती. यात काँग्रेस सरस आहे. पाच विधानसभा मतदार संघावर काँग्रेसची मांड घट्ट आहे. शिवाय, मराठा समाजाला उमेदवारी मिळाल्यामुळे भाजप आणि निजदच्या कार्यकर्त्यांचे लोंढे काँग्रेसच्या प्रवाहात सामिल होताना दिसत आहेत. कोणत्याच विधानसभा मतदार संघात डॉ. निंबाळकर यांना टोकाचा विरोध नाही. त्याउलट खानापूरात त्यांच्या विरोधात कोल्हेकुई सुरू असणे ही तालुक्यासाठी तरी लांच्छनास्पद आहे. तरीही सामान्य मतदार यावेळी सजग होत आहे. ही जमेची आणि अश्वासक बाब आहे. खानापूरकरांनो, हीच ती वेळ आहे. ३० वर्षे झुलवत आणि भुलवत ठेवून विकासापासून वंचीत ठेवलेल्या भाजपला हद्दपार करण्याची.
लोकसभा: एकाचवेळी संसदेत जाणारे पहिले जोडपे कोण होते?
समांतर क्रांती विशेष / चेतन लक्केबैलकर मुळचे मंगळूरीयन असलेले जोकीम अल्वा हे स्वातंत्र्य सैनिक होते. त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला. त्यातूनच त्यांचा देशातील तत्कालीन नेत्यांशी संपर्क आला. साहजिकच ते राजकीय प्रवाहात लोटले गेले. निष्णात वकील आणि व्यासंगी पत्रकार असलेले जोकीम अल्वा १९५२, १९५७ आणि १९६२ च्या लोकसभा निवडणुकीत विजयी झाले होते. १९५२ च्या पहिल्या सार्वत्रिक […]