Car crushed under container; Six members of the same family killed
समांतर क्रांती / बंगळूर
अचानक कंटेनर कारवर कोसळल्याने एकाच कुटुंबातील सहा जण जागीच ठार झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्ग ४ वर घडली. नेलमंगल येथील ताळकेरे येथे हा अपघात घडला असून घटनास्थळावरील चित्र थरकाप उडविणारे होते.
याबाबतची अधिक माहिती अशी, मूळचे जत्त तालुक्यातील मोरबगी (जि.सांगली-महाराष्ट्र) येथील आणि बंगळूरच्या एचआरएस लेआऊटमधील आयएएसटी या सॉफ्टवेअर कंपनीचे मालक चंद्रम् योगप्पगोळ यांचे संपूर्ण कुटुंब या अपघातात मृत झाले आहे.
ते आपल्या कारमधून तुमकूरहून बंगळूरला जात असतांना ताळेकरे येथे अचानक कारवर कंटेनर पलटी झाला. त्यात कारसह सहाजण चिरडले गेले. तीन क्रेनचा वापर करून कंटेनर बाजुला सारण्यात आल्यानंतर कारमधील दृष्य पाहून उपस्थित पोलिस अधिकाऱ्यांसह उपस्थितांचे हृदय हेलावून गेले होते.
घटनेची माहिती मिळताच बंगळूर ग्रामीण जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक एस.के.बाबा यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर सर्व सोपस्कार पूर्ण करण्यात आले. कारमधील दिक्षा हिच्या पाठ्यपुस्तकावरील नावावरून मृतांची ओळख पटविण्यात आली. मृतांमध्ये चंद्रम गोगप्पगोळ (४६) यांच्यासह त्यांची पत्नी धोराबाई (४०),मुलगा ज्ञान (१६), मुलगी दिक्षा (१०), आर्या (०६) व भावजय विजयालक्ष्मी (३५) हे सर्वजन जागीच ठार झाले.
जत तालुक्यावर या घटनेमुळे शोककळा पसरली आहे. घटनेची नोंद पोलिसात झाली असून अधिक तपास सुरू आहे. महामार्गावर कॅटेनर वाहतूक करणाऱ्या वाहनाच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष पोलिसांनी व्यक्त केला आहे.
'त्या' अपघाताचा व्हिडीओ.. असा झाला अपघात
समांतर क्रांती / बंगळूर (Video सौजन्य Nav Samaja) अचानक कंटेनर कारवर कोसळल्याने एकाच कुटुंबातील सहा जण जागीच ठार झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्ग ४ वर घडली. नेलमंगल येथील ताळकेरे येथे हा अपघात घडला असून घटनास्थळावरील चित्र थरकाप उडविणारे होते. याबाबतची अधिक माहिती अशी, मूळचे जत्त तालुक्यातील मोरबगी (जि.सांगली-महाराष्ट्र) येथील आणि बंगळूरच्या एचआरएस लेआऊटमधील आयएएसटी या सॉफ्टवेअर […]