समांतर क्रांती / खानापूर
खानापूरहून करंबळकडे जाणारी कार पलटी झाल्याने चालकासह दोघे जखमी झाल्याची घटना घडली.चालकाच्या अतिघाईमुळे हा अपघात घडल्याचे समजते. केवळ सुदैवाने या
अपघातात मोठी हानी टळली.
या अपघातात चालक लोकेश तुकाराम भेकणे याची उजवी मांडी कापली आहे, तर प्रवासी राम नागेंद्र चोपडे हा किरकोळ जखमी झाला आहे. दोघांवर खानापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी बेळगावला हलविण्यात आले आहे.
चालक लोकेश याच्या चुकीमुळे कार रस्त्याच्या कडेला पलटी झाल्याचे प्रत्यक्षदर्शींकडून समजते. कार अतिवेगाने चालविली जात होती. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. पोलीसांना घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. उशिरापर्यंत घटनेची पोलीसात नोंद झाली नव्हती.
सीमाभाग केंद्रशासीत करा.. कुणी केली मागणी?
समांतर क्रांती / बेळगाव कर्नाटक सरकारकडून सीमावासीयांवर होणाऱ्या अन्यायाने परिसीमा ओलांडली असून सर्वोच्च न्यायालयातील खटल्याचा निकाल लागेपर्यंत सीमाभाग केंद्रशासीत करावा, अशी मागणी शिवसेना आमदार माजी मंत्री आदित्य ठाकरे आणि राज्यसभा सदस्या प्रियंका चतुर्वेदी यांनी केली आहे. आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तर खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमीत शहा यांना या […]