
बंगळूर: जातीगणना हा सध्या राज्यात चर्चेचा विषय आहे. हा अहवाल आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मांडला जाणार का? याकडे राज्याचे लक्ष लागून राहिले होते. पण सरकारने पुढील मंत्रिमंडळ बैठकीत मांडण्याची टूम काढली आहे. मात्र मंत्रिमंडळ बैठकीत अहवाल मंडण्यापूर्वीच जात जनगणनेचा अहवाल फुटला आहे. अहवालाच्या अंमलबजावणीपूर्वीच माहिती फुटल्याने खळबळ उडाली आहे.
लीक झालेल्या जात जनगणना अहवालात काय आहे? जात जनगणनेचा अहवाल लीक झाला आहे, यात कोणत्या जातीची वाढ झाली आहे? अहवालात अनुसूचित जाती पहिल्या क्रमांकावर आहेत. त्यानंतर अल्पसंख्याक असलेले मुस्लिम दुसऱ्या क्रमांकावर आहेत. लिंगायत समाज तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. ओक्कलिगा समाज चौथ्या क्रमांकावर असल्याची माहिती समोर आली आहे.
लिंगायत आणि ओक्कलिगांनी जातीय जनगणनेविरोधात 2015 पासूनच आवाज उठवला आहे. हा अहवाल अवैज्ञानिक असल्याबद्दल संताप लिंगायत, ओक्कलिगा समाजातून व्यक्त होत आहे. राज्य सरकारने जात जनगणनेचा अहवाल सादर करण्यास सरकार सज्ज असल्याचे म्हटल्याने गोंधळ माजला असताना आता पुन्हा एकदा जात जनगणनेचा अहवाल फुटल्याने राजकारणात खळबळ उडाली आहे.

भाजपवाल्यांनो, आत्ता कसं वाटतंय? छान..छान..ना?
समांतर क्रांती / खानापूर द्वेषाचं राजकारण करणाऱ्या स्थानिक भाजपच्या नेत्यांना नगर पंचायतीने जोर का झटका दिला आहे. विधान परिषद माजी सदस्य महांतेश कवठगीमठ आणि भाजपचे माजी शहराध्यक्ष सुनिल नायक यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारा फलाक लावला होता. तो आवघ्या कांही तासात हटविला. फलकावर केवळ मराठी असल्याने फलक हटविल्याचे नगर पंचायतीने म्हटले असून आता भाजपवाल्यांना कसं वाटतंय? […]