वर्गविग्रहाचे तत्वज्ञान सर्वसामान्य जनांपर्यंत पोहचविणारा महाराष्ट्राच्या ग्रामीण मातीतील बोली आणि कलांचा संस्कार घेऊन आलेला सिध्दहस्त कादंबरीकार, लोकनाट्यकार म्हणून ज्यांची प्रतिमा आहे, ते शाहीर अण्णाभाऊ अर्थात तुकाराम भाऊराव साठे यांच्या स्मृतीदिनी घेतलेली थोर विचारवंत, स्वातंत्र्य सैनिक, जेष्ठ कामगार नेते, गोवा मुक्ती आंदोलन आणि सीमालढ्याचे आग्रणी, साहित्यिक-पत्रकार कॉ. कृष्णा मेणसे (अप्पा) यांची ही साप्ताहिक समांतर क्रांतीत प्रसिध्द […]
समांतर क्रांती / रविवारची मुलाखत अलिकडे बांधावरच्या शेतकऱ्यांची संख्या वाढली आहे. तशीच पंचायतीच्या कार्यालयात आणि गावाच्या पारावर बसून विकासाच्या गप्पा हाणणारेही ‘पायलीस पंधरा’ मिळतील. पण, खूप कमी सदस्य जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी पंचायतीचे कार्यालय दणाणून सोडतांनाच प्रत्यक्ष विकास कामावर हातात टिकाव आणि फावडा घेऊन कामाला लागतात. जांबोटी ग्राम पंचायतीच्या अध्यक्ष-उपाध्यक्षांची नुकताच निवड झाली. यात जास्त चर्चेत […]