महिलांचा वाढलेला टक्का, कुणाला धक्का? विशेष रिपोर्ट / चेतन लक्केबैलकर पद्मश्री सुक्री गौडा यांना यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतदनाचा हक्क बजावता आला नाही. आधीच आजारपणामुळे त्या अत्यवस्थ आहेत, त्यात मतदानाचा हक्क बजावता न आल्याने त्या आणखी अस्वस्थ झाल्या आहेत. पद्मश्री या देशातील सर्वोच्च पुरस्काराने सन्मानीत महिलेला मतदानाचा बहुमोल हक्क बजावता येत नाही, ही किती मोठी दुर्दैवी […]
गेल्या वेळी उत्तरा कन्नड लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार अनंतकुमार हेगडे जवळपास पाच लाख मतांनी विजयी झाले होते. आता निवडणुकीच्या रिंगणात अनंतकुमार हेगडे नाहीत आणि भाजपची मोदी लाटही नाही. मागच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने कोणताही जनाधार नसलेल्या निधर्मी जनता दलाला हा मतदारसंघ सोडला होता आणि अनंतकुमार हेगड यांना विजय मिळवून दिला होता. पण आता परिस्थिती पूर्णपणे बदलली […]
समांतर क्रांती विशेष पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळसुत्राच्या विषयावरून विरोधकांवर बेताल आरोप करीत आहेत. प्रत्यक्षात त्यांच्या विकासाच्या वेंधळ्या कल्पनेमुळे गोरगरिबांना मंगळसुत्राविना लग्ने करण्याची वेळ आली आहे. सोन्याचे दर तब्बल ७५०१५ रुपयांवर पोहचले असून गेल्या दहा वर्षांत तब्बल ४५ हजारांने सोने महाग झाले आहे. मोदीजी आम्ही मुलींची लग्नं कशी करु, असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे. सर्वसामान्य […]
विशेष / चेतन लक्केबैलकर मागील ३० वर्षांचा अखंडकाळ वगळता उत्तर कन्नड (कारवार) लोकसभा मतदार संघावर काँग्रेसचा प्रभाव राहिला आहे. हा मतदार संघ काँग्रेसचा बालेकिल्ला होता. आता पुन्हा हा गड राखण्याची संधी काँग्रेसकडे आहे. डॉ. अंजली निंबाळकर यांनी त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा चालविली असल्याने त्यांना यशाची खात्री वाटते. तर भाजपने विश्वेश्वर हेगडे – कागेरी यांना उमेदवारी दिल्याने […]
विशेष संपादकीय उचलली जीभ लावली टाळ्याला ही म्हण भाजपच्या नेत्यांसाठीच अस्तित्वात आली असावी, याबद्दल हल्ली कुणालाच शंका वाटत नाही. खोटारडेपणा आणि आपमतलबी वर्तणुकीसाठी सरावलेल्या भाजप नेत्यांकडून बेताल वक्तव्य केली जाणे ही कांही नवी बाब नाही. जुन्या बाटलीत जुनी अशी त्यांची आवस्था आहे. दहा वर्षे केंद्रात सत्ता असतांनाही आताच्या लोकसभा निवडणुकीत ‘अंधभक्त’ हिंदू खतरेमें है’ची ओरड […]
महाराष्ट्राच्या तुलनेत कर्नाटक आणि इतर राज्यातील छत्रिय मराठा समाज विखुरला आहे. तो आजही एकसंघ नाही. विशेषत: कर्नाटकातील मराठा समाज विविध भागात आहे. त्यांची नाळ आजही छत्रपती शिवरायांच्या स्वराज्य संकल्पनेशी जोडली गेली आहे. त्यांच्या संस्कृतीतून ती नेहमीच अधोरेखीत होत असते. कर्नाटकातील मराठा समाज एकवटला पाहिजे. तो एकवेळ अल्पसंख्य असला तरी चालेल, पण राज्यात मराठ्यांना सोयी-सुविधा मिळाल्या […]
समांतर क्रांती विशेष / चेतन लक्केबैलकर मुळचे मंगळूरीयन असलेले जोकीम अल्वा हे स्वातंत्र्य सैनिक होते. त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला. त्यातूनच त्यांचा देशातील तत्कालीन नेत्यांशी संपर्क आला. साहजिकच ते राजकीय प्रवाहात लोटले गेले. निष्णात वकील आणि व्यासंगी पत्रकार असलेले जोकीम अल्वा १९५२, १९५७ आणि १९६२ च्या लोकसभा निवडणुकीत विजयी झाले होते. १९५२ च्या पहिल्या सार्वत्रिक […]
विशेष संपादकीय सत्तापिपासू भाजपाने रान उठवल्याच्या काळात इंडिया आघाडीने दंड थोपटले आहेत. अशा काळात कारवार लोकसभा मतदार संघातून माजी केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडेंना भाजपने नारळ दिला. राज्याचे अनेक वर्षे मंत्री आणि विधान परिषदेचे सभापतीपदी राहिलेले विश्वेश्वर हेगडे-कागेरी यांना भाजपने उमेदवारी दिली. काँग्रेसने खानापूरच्या माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांना उमेदवारी देत कारवार (कॅनरा) लोकसभेचा गड […]
आता मला बोलवंच लागेल / चेतन लक्केबैलकर खानापूर शहर म्हणजे अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराचे ‘पर्यटन स्थळ’ बनले आहे. यात लोकप्रतिनिधींचा आणि समाजसेवकांची झुल पांघरलेल्या बाजारबुणग्यांचा खेळ होतो आणि स्थानिक गोरगरीब व्यवसायीकांचा जीव जातो. विशेष म्हणजे येथे येणारा कुणीच अधिकारी परप्रांतीयांच्या वाढत्या अतिक्रमणावर कारवाई करण्याचे धाडस करीत नाही. जांबोटी क्रॉस येथील खोकी अचानकपणे कोणत्याही प्रकारची कल्पना न […]
मांस खाऊन मंदिरात गेलो तर काय झाले? असा प्रश्न करून वाद ओढवून घेतानाच अहिंद म्हणजे हिंदुत्ववादाला छेद देणारे कर्नाटकातील धाडसी व्यक्तीमत्व म्हणजे सिध्दरामय्या. आता ते दुसऱ्यांदा कर्नाटकाचे मुख्यमंत्री म्हणून शपथबध्द होणार आहेत. त्यांच्याविषयी सर्वसामान्यांना माहीत नसलेले त्यांच्या व्यक्तीमत्वाचे पैलू या लेखात मांडले आहेत.. सिद्धरामय्या यांची जीवनकथा ही या देशातील एका सामान्य माणसाच्या जीवनाची कहाणी आहे, […]