खानापूर तालुक्यातील दोन, महाराष्ट्रातील चार माऊलींची भेट मलप्रभेच्या उगमस्थानी १४ वर्षानंतर झाली भगिणींची भेट जांबोटीकर सरदेसाईंना मानपान, पहिल्या ओटीचा मान कोदाळी, गुंळब, कळसगादे, केंद्रे (वीजघर) येथील माऊली आल्या भेटीला.. कणकुंबी/चेतन लक्केबैलकर: कळसा प्रकल्पामुळे तीन्ही राज्यात नेहमीच चर्चेत राहणाऱ्या आणि याच प्रकल्पामुळे राज्याराज्यातील वाद निर्माण झालेल्या कणकुंबीत १४ वर्षानंतर सहा माऊली भगिणींची भेट झाली आणि कणकुंबीचे […]
सहकार / चेतन लक्केबैलकर कांही माणसं अतिमहत्वाकांक्षी असतात. त्यांना त्यांचे ध्येय गाठल्याशिवाय चैन पडत नसते. त्यासाठी ती एखाद्या मढ्याच्या छाताडावर पाय ठेवून सोपान चढायलाही मागे पुढे पाहत नाहीत. तर कांही जणांची महत्वाकांक्षा आभाळाला भिडण्याची जरी असली तरी त्यांची चिमणी होऊन दाणे टिपण्याचीही कुवत नसते. या मधल्या पोकळीत जी माणसं असतात, ती खऱ्या अर्थाने यशाचे शिखर […]
चेतन लक्केबैलकर शाळेत वर्गातील फळ्याच्या अगदी मधोमध लिहिलेला ‘मिठाशिवाय चव नाही, आईशिवाय माया नाही.’ हा सुविचार आणि सांबर-डाळ आळणी किंवा खारट झाल्यास येणारा संबंध वगळता मिठाशी अस्मादिकांस कांही देणं-घेणं नाही. हिंदी सिनेमातल्या ‘नमकहराम, मै तुझे जिंदा नही छोडुंगा’चा डॉयलॉग सोडला तर दररोजच्या उदरभरणात मिठाला अणण्यसाधारण महत्व असुनही त्याच्याशी उपरोक्त नोंद केल्याप्रमाणे क्वचीतच आम्ही मिठास जागतो.(अर्थातच! […]
सीमाचळवळ / चेतन लक्केबैलकरगेल्या ६६ वर्षांपासून सीमावासीय मराठी जनता त्यांच्या न्याय हक्कासाठी लढत आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाची चळवळ धगधगत आहे. पण, साडेसहा दशके या प्रश्नाचे भीजत घोंगडे का आहे? यावर तोडगा का निघाला नाही? तोडगा निघाला तरी प्रश्न जैसेथेच का? अनेकवेळा तोडगा निघाला तरी त्याला कुणी खो घातला? आणि का? सीमाप्रश्न नक्की आहे तरी काय? १ […]
जय महाराष्ट्र! बोला की, काय चाललंय? हा संवाद कोल्हापूर, मुंबई किंवा पुण्यातला नाही. सीमाभागातील तरूणसुध्दा संभाषणाची सुरूवात ‘जय महाराष्ट्र’ने करतात. मराठी आपली मायबोली आहे, तीच्यासाठी गेल्या ६६ वर्षांपासून आपले बापजादे खपत आले आहेत,याची जाणिव उशिरा का होईना सीमाभागातील तरूणांना होत आहे. इतकंच काय एरव्ही हॉटेलमध्ये चहाचे घोट रिचवितांना टवाळकी करणारे तरूणही सीमाप्रश्नावर भरभरून बोलतांना दिसताहेत. […]