चोर्ला घाटात शिर्डीला जाणाऱ्या वाहनाचा अपघात
खानापूर: गोव्याहून शिर्डीला निघालेल्या कारला बेळगावहून गोव्याकडे जाणाऱ्या चेसीने जोराची धडक दिल्याने अपघात घडला. केवळ सुदैवाने कार दरीत कोसळली नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. यामध्ये सुदैवाने कुणीही जखमी झाले नाही, असे वाळपई पोलीसांनी सांगितले. कारचे मात्र मोठे नुकासन झाले आहे. दरम्यान, अपघातानंतर चेसी चालकाने जंगलातून पळ काढला. पण त्याला केरी चेकपोस्टवर ताब्यात घेण्यात आले. अपघात […]