समांतर क्रांती / खानापूर आमंत्रण लॉजवर छापा टाकून वेश्या व्यवसाय उधळून लावलेल्या खानापूर पोलिसांनी ‘स्वखुशी’ने चाललेल्या ‘धंद्या’ला हातभार लावल्याची चर्चा आहे. शहरांतर्गत महामार्गावरील गामधीनगर येथील एका लॉजवर शनिवारी पोलिसांनी छापा टाकला. त्याठिकाणी मुला-मुलींसह अनेक जोडपी आढळली. पण, त्यांनी आम्ही स्वखुशीने लॉजवर आल्याचे सांगितल्यानंतर पोलिसांनी कारवाई टाळली. खानापूर शहर आणि परिसरातील लॉज ही शरिर विक्रयाची ठिकाणे […]
समांतर क्रांती / बेळगाव जिल्हा आणि तालुका पंचायतींच्या कार्यकारीणी बरखास्त होऊन चार वर्षांचा कालावधी लोटला तरी निवडणूक घेतली न गेल्यामुळे विकास कामांना खिळ बसली आहे. आता तर कॅग (नियंत्रण आणि महालेखापाल) अहवालात सुध्दा नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी फेब्रूवारी महिन्यात निवडणूक होईल, असे सुतोवाच्च केले आहे. २०२१ मध्ये जिल्हा आणि […]
समांतर क्रांती / नंदगड खानापूर तालुक्यातील हंदूर येथे मासेमारीसाठी गेलेल्या तरूणाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (ता.१४) घडली. या घटनेत माबुली हसनसाब काद्रोळी असे या घटनेत मृत झालेल्या तरूणाचे नाव आहे. पोलीसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, माबुली हा आज सकाळी नेहमीप्रमाणे मासेमारीसाठी गावापासून जवळच असणाऱ्या तालवाकडे गेला होता. तो दुपार उलटून गेली तरी घरी […]
समांतर क्रांती / बेळगाव बिम्समध्ये नवजात बाळाला सोडून पळालेल्या बिबीजान सद्दाम हुसेन सय्यद हिला अटल करून न्यायालयात हजर केले असता तिची रवानगी हिंडलगा कारागृहात करण्यात आली. शुक्रवारी तिच्यावर एपीएमसी पोलीसांत गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर आज शनिवारी (ता. १४) तिला अटक करण्यात आली. बैलहोंगल येथील बिबिजान हिला प्रसूतीसाठी मागील शनिवारी (ता. ८) बिम्स रुग्णालयात दाखल […]
समांतर क्रांती / खानापूर खानापूर शहर चारही बाजूनी अफाट पसरत आहे. शहराला लागून असलेल्या उपनगरांची संख्या दिवसेदिवस वाढत चालली आहे. पण, या उपनगरांना मुलभूत सुविधा पोहचविण्यात नगर पंचायत आणि ग्राम पंचायती अपयशी ठरल्या आहेत. परिणामी, शहरालगतच्या लाखोंचा महसूल मिळवून देणाऱ्या पॉश नगरांमध्ये ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. खानापूर शहर नगर पंचायत अखत्यारीत […]
समांतर क्रांती / खानापूर अस्वलाच्या हल्ल्यात जखमी झालेले सखाराम महादेव गावकर यांचा पाय निकामी झाला आहे. त्यांच्या उपचारासाठी निधी देण्यास वनखात्याने चालढकल चालविली आहे. परिणामी, त्यांच्या कुटुंबीयांवर आर्थिक संकट ओढवले आहे. याची माहिती मिळताच ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. ईश्वर घाडी यांनी सखाराम यांची रुग्णालयात भेट घेऊन त्यांना रु. ५००० ची आर्थिक मदत केली. तसेच त्याना […]
समांतर क्रांती / खानापूर येथील महालक्ष्मी ग्रूपच्या लैला शुगर्सच्या गाळप हंगामाला नुकताच सुरूवात झाली आहे. यंदा गाळपाला महिनाभर उशिर झाल्यामुळे शेतकऱ्यांतून चिंता व्यक्त केली जात होती. तसेच विरोधकांकडून आरोप केले जात असतांना गाळपाला सुरूवात झाली आहे. लैलाचे चेअरमन आमदार विठ्ठल हलगेकर यांनी गव्हाणीत ऊस टाकून गाळपाचा शुभारभ केला. कारखान्याची गाळप क्षमता वाढविण्यात आली आहे. […]
समांतर क्रांती / बेळगाव बिम्स रूग्णालयात नवजात बाळाला सोडून पळालेल्या महिलेविरोधात एपीएमसी पोलीसांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेतील नवजात बाळाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. बैलहोंगल शहरातील बाबीजान सद्दाम हुसेन सय्यद असे त्या महिलेचे नाव आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बबीजानला ८ डिसेंबर रोजी BIMS मध्ये दाखल करण्यात आले आणि त्याच दिवशी तिने एका […]
हैदराबाद: सध्या पुष्पा २ हा चित्रपट दररोज बॉक्स ऑफीसवर नवनवे विक्रमी नोंदवीत आहे. या चित्रपटाचा नायक पुष्पा अर्थात तेलगू सुपरस्टार अल्लुअर्जूनला दुपारी पोलीसांनी अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता त्याची १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. #pushpa-2 #Court Custody to Allu Arjun ४ डिसेंबर रोजी पुष्पा २ या चित्रपटाचा प्रिमीयर शो संध्या […]
समांतर क्रांती / खानापूर माण (ता. खानापूर) येथील शेतकरी सखाराम महादेव गावकर (वय ६७) यांच्यावर शेतवडीत काम करीत असतांना दि. २ रोजी हल्ला केला होता. त्यांच्यावर बेळगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांचा एक पाय निकामी झाला आहे. त्यांच्या उपचारासाठी लाखोंचा खर्च होत असतांना वनखात्याकडून त्यांना केवळ ४० हजार देण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांच्यावरील […]