रामनगर: पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा रामनगर (ता.जोयडा) पांढरी नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता. १२) सायंकाळी घडली. मुबारक मेहबूब पठाण (वय ११, रा.हुबळी) व अफान अफताब खान (वय १२, चर्च गल्ली-रामनगर) अशी मयत बालकांची नावे आहेत. ते अन्य तिघा मित्रांसमवेत पोहायला नांद्रेकर पुलाजवळ गेले होते. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी, दिवसभर उष्णतेने अंगाची […]
बेळगाव: आरोग्य क्षेत्रात पारिचारीकांची प्रमुख भूमिका असते. त्यांचे कार्य मोलाचे असते. त्यामुळेच या क्षेत्रातील कामकाज सोयीचे होते, असे मत डॉ. सोनाली सरनोबत यांनी व्यक्त केले. त्या अरिहंत हॉस्पिटलमध्ये आंतराष्ट्रीय नर्स (पारिचारीका) दिनानिमित्त आयोजीत कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. यावेळी व्यासपिठावर मिनाक्षीताई रावसाहेब पाटील, डॉ. महादेव दिक्षीत आणि डॉ. माधुरी दिक्षीत उपस्थित होत्या. प्रसंगी आंतरराष्ट्रीय […]
खानापूर : सीमा भागातील विद्यार्थ्यांना कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठात मोफत आणि सवलतीत प्रवेश दिला जाणार आहे. त्याबाबत मंगळवारी (ता. १४ ) खानापूर येथील शिवस्मारक येथे सकाळी साडे दहा वाजता मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याचा खानापूर तालुक्यासह सीमा भागातील विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने करण्यात आले आहे.शिवाजी विद्यापीठतर्फे सिमाभागातील […]
जत्त: समोरील टायर फुटून क्रुझर पलटी झाल्याने घडलेल्या अपघातात तीन महिला जागीच ठार झाल्या. महाराष्ट्रात कामाला निघालेल्या अथनीच्या महिलांवर काळाने घातला. ही घटना जत्तजवळ घडली असून या अपघातात अन्य दहा जण जखमी झाले आहेत. सदर अपघातात महादेवी चौगुला, गिता दोडमनी, कस्तुरी (तिघीही रा. बळ्ळीगेरी, ता.अथणी) या ठार झाल्या. टायर फुटल्यानंतर क्रुझरने चारवेळा पटली घेत रस्त्याच्या […]
खानापूर: शहर परिसरासह तालुक्याच्या ग्रामिण भागात तब्बल तासभर पावसाने हजेरी लावली. कांही काळ वातावरणात गारवा निर्माण झाला होता, पण पुन्हा उष्णता वाढली. दुसऱ्यांदा आज शनिवारी पावसाने हजेरी लावल्यामुळे समाधान व्यक्त होत आहे. गतवर्षी पावसाने हात दिला होता. त्यामुळे तालुक्यातील नदी-नाल्यांत मुबलक पाणी साठा होऊ शकला नव्हता. सध्या सर्वच नदी-नाल्यात ठणठणाट आहे. अंतरजल पातळीतदेखील कमालाची घट […]
मुंबई: विवेकवादी विचारवंत आणि अंधश्रध्दा निर्मूलन समिती अध्यक्ष नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणी विशेष न्यायालयाने दोघा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसेच प्रत्येकी पाच लाखांचा दंड ठोठावला आहे. शार्पशुटर सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांनीच डॉ. दाभोळकर यांची हत्या केल्याचे स्पष्ट झाले. हे दोघेही या प्रकरणात डॉ. विरेंद्रसिंह तावडे, ॲड. संजी पुनाळकर आणि विक्रम भावे यांची […]
४ लाख ४५ हजार लंपास; धागेदोरे कलकत्यापर्यंत खानापूर: येथील विमा एजंट शंकर नारायण माळवे (गणेशनगर-खानापूर) यांच्या बँक खात्यातून तब्बल ४ लाख ४५ हजारांची रक्कम लांबविण्यात आली आहे. ऑनलाईन बँकींगद्वारे ही रक्कम लुबाडण्यात आली असून कलकत्यातील एका बँक खात्यात जमा झाली असल्याचे स्पष् झाले आहे. यासंबंधी सीईएन विभागात तक्रार नोंद झाली असून अधिक तपास सुरू आहे. […]
जांबोटी: चोर्ला महामार्गावर बसला टेंपोने धडक दिल्याने झालेल्या अपघातात टेंपो चालक किरकोळ जखमी झाल्याची घटना आज शुक्रवारी (ता. १०) घडली. यामुळे या मार्गावर तब्बल चार तास वाहयूक कोंडी झाली होती. अपघातस्थळापासून दोन्ही बाजुला लांबच्या लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोलिसात या घटनेची नोंद झाली आहे. कदंबा बस पणजीहून बेळगावकडे तर टेंपो बेळगावहून पणजीकडे निघाला होता. […]
महिलांचा वाढलेला टक्का, कुणाला धक्का? विशेष रिपोर्ट / चेतन लक्केबैलकर पद्मश्री सुक्री गौडा यांना यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतदनाचा हक्क बजावता आला नाही. आधीच आजारपणामुळे त्या अत्यवस्थ आहेत, त्यात मतदानाचा हक्क बजावता न आल्याने त्या आणखी अस्वस्थ झाल्या आहेत. पद्मश्री या देशातील सर्वोच्च पुरस्काराने सन्मानीत महिलेला मतदानाचा बहुमोल हक्क बजावता येत नाही, ही किती मोठी दुर्दैवी […]
76.52 percent polling from Uttara Kannada. कारवार: उत्तर कन्नड लोकसभा मतदार संघासाठी झालेल्या निवडणुकीत चुरशीने ७६.५२ टक्के मतदान झाले आहे. तर खानापूर तालुक्यातील २ लाख १९ हजार ४४२ मतदारांपैकी १ लाख ६१ हजार ९१३ इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. वाढलेली टक्केवारी नेहमीच सत्ताधारी पक्षाच्या उमेदवाराला मारक ठरते, तसे झाल्यास पुन्हा काँग्रेस उत्तर कन्नडचा गड […]