खानापूर : हलकर्णी ता. खानापूर येथील नामांकित सरकारी कंत्राटदार ईश्वर अंबाजी खानापुरी (83) यांचे अल्पशा आजाराने शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, दोन मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. आज शनिवारी सकाळी 12 वा. हलकर्णी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यविधी होणार आहे. राज्य औद्योगिक बॅंकेचे माजी उपाध्यक्ष दिवंगत कृष्णा खानापुरी यांचे ते मोठे […]
उपमुख्यमंत्री डी.के.शिवकुमार यांचा आरोप; कुमठा येथे डॉ. अंजली निंबाळकर यांची प्रचारसभा कुमठा: अघोषीत हुकुमशाहीला घाबरू नका असे आवाहन देशातील लोकांना करीत राहुल गांधी यांनी देशभर भारत जोडो यात्रा केली. आम्हीही कर्नाटकात प्रजाध्वनी (जनतेचा आवाज) यात्रा सुरू केली आहे. आम्ही कुणाला फसविले नाही, विधानसभा निवडणुकीत जी आश्वासने दिली ती आवघ्या महिनाभरात पूर्ण केली. कोणतीही योजना जाती-धर्मावर […]
कुमठा: येथे आयोजीत करण्यात आलेल्या प्रचार सभेला उपस्थि राहण्यासाठी भटकळ आणि उत्तर कन्नड (कारवार) जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी भव्य अशी बाईक रॅली काढून शक्तीप्रदर्शन केले. जिल्हा पालकमंत्री मंकाळू वैद्य यांची मुलगी मीना वैद्य यांच्या नेतृत्वाखाली भटकळ ते कुमठापर्यंत काढण्यात आलेल्या रॅलीत उमेदवार डॉ. अंजली निंबाळकरदेखील सहभागी झाल्या होत्या. एकंदर, ही रॅली इतकी भव्य होती की, त्यामुळे […]
मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांचा घाणाघात; मुंदगोडमधील प्रचार सभेला तोबा गर्दी मुंदगोड: नोकरी देण्याची मागणी करणाऱ्या तरूणांना पकोडे तळण्याचा आणि विकण्याचा सल्ला पंतप्रधान मोदी देतात. मोदी-मोदी ओरडणाऱ्या तरूणांना त्यांनी वाऱ्यावर सोडले आहे. नरेंद्र मोदी हे थापाड्यांचे सरदार तर भाजप हा थापाड्यांचा कारखाना आहे, असा घणाघात मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी मुंदगोड येथे डॉ. अंजली निंबाळकर यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत […]
यशवंत बिर्जेंचे हडलग्यात आवाहन; डॉ. निंबाळकरांना पाठिंबा नंदगड: स्वार्थासाठी दुसऱ्या पक्षाच्या वळचणीला गेलेले भाजपचे नेते बरळत आहेत, खोटीनाटी आमिषे दाखवत आहेत. त्यांच्या भूलतापांना बळी पडू नका. भाजपच्या केंद्रातील सरकारने गोरगरीब जनतेला भिकेला लावले. पण, कर्नाटकातील काँग्रेस सरकारने गोरगरीब जनतेला सावरले आहे. महिलांना प्रतिमहा दोन हजार रुपये दिले जात आहेत, बसप्रवास मोफत झाला आहे. वीजबिलात सवलत […]
डॉ. अंजली निंबाळकर यांचा आरोप; कारवार तालुक्यात प्रचार सभा कारवार: उज्वला योजना पूर्णपणे फोल ठरल्यामुळे भाजप-निजदने आता प्रज्वल योजना लाँच केली आहे. महिलांवरील अत्याचारात कोण आघाडीवर आहे, हेच यातून दिसून येते. भाजपच्या नेत्यांना खासदार प्रज्वल रेवण्णा यांच्या गुन्हेगारी वृत्तीची पूर्णत: माहिती असूनही खुद्द पंतप्रधान त्यांचा प्रचार करतात, यावरून भाजपची नीतीमत्ता किती घसरली आहे, हे संपूर्ण […]
खानापूर: आम्ही जे केलं, तेच तुम्हीही करा, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्नाटकात ‘ऑपरेशन लोटस’चे आवाहन भाजपला केले. उत्तर कन्नड लोकसभा मतदार संघातील भाजपचे उमेदवार विश्वेश्वर हेगडे- कागेरी यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. खानापुरातील मलप्रभा मैदानावर झालेल्या या सभेला ते तब्बल चार तास उशिरा पोहचले. त्यातही रटाळ भाषणामुळे उपस्थित कंटाळले होते. देशात पुन्हा […]
खानापूर: दुचाकीला ट्रकने मागून धडक दिल्याने घडलेल्या अपघातात शिवठाण येथील तरूण ठार झाला तर त्याचा मित्र जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना खानापूर-जांबोटी मार्गावर बाचोळी फाट्यानजीक दुपारी १२ च्या सुमारास घडली. याबाबत मिळालेली माहिती अशी, शिवठाण येथील तरून विधेश तुकाराम मिराशी (वय २५) व त्याचा मित्र दुचाकीवरून मित्राच्या लग्नाला जात होते. दरम्यान, […]
संग्रहीत फोटो खानापूर: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज सायंकाळी भाजपच्या प्रचारार्थ सभा होणार आहे. या सभेला गर्दी जमविण्यासाठी रोजगार हमी योजनेच्या कामांवरील मजूर महिलांना बोलाविण्यात आले असून त्यांना दुपारनंतर ‘पगारी’ सुट्टी दिली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. तसे झाल्यास संबंधीत ग्राम पंचायतींचे पीडीओ आणि रोजगार हमी योजना संयोजकांविरोधात तक्रार करणार आहोत, अशी माहिती ब्लॉक […]
समांतर क्रांती विशेष पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळसुत्राच्या विषयावरून विरोधकांवर बेताल आरोप करीत आहेत. प्रत्यक्षात त्यांच्या विकासाच्या वेंधळ्या कल्पनेमुळे गोरगरिबांना मंगळसुत्राविना लग्ने करण्याची वेळ आली आहे. सोन्याचे दर तब्बल ७५०१५ रुपयांवर पोहचले असून गेल्या दहा वर्षांत तब्बल ४५ हजारांने सोने महाग झाले आहे. मोदीजी आम्ही मुलींची लग्नं कशी करु, असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे. सर्वसामान्य […]