राष्ट्रीय पक्षांकडून मराठी माणसाचे खच्चीकरण: रोहीत पाटील
जांबोटी येथे मंगळवारी म.ए.समितीचे अधिकृत उमेदवार मुरलीधर पाटील यांच्या प्रचारार्थ रॅली आणि प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. पुढे बोलतांना रोहीत पाटील म्हणाले, मराठी भाषा आणि संस्कृती जपण्यासाठी सीमावासीयांनी शर्थ चालविली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस नेहमीच सीमावासीयांच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली आहे. यापुढे सीमावासीयांवरील अन्याय सहन केला जाणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस सीमावासीयांच्या बाजुने […]