समांतर क्रांती वृत्त खानापूर: आमदारांना तालुका पंचायतीच्या आवारातील कार्यालयाचे वावडे का? असा प्रश्न ‘समांतर क्रांती’ने उपस्थित केला होता. त्यावर आता चक्क मागासवरर्यीय कल्याण खात्याने प्रश्न उपस्थित केला आहे. देवराज अर्स कार्यालयात आमदारांचे कार्यालय सुरू करण्यास संधी नाही, असे आमदार विठ्ठल हलगेकर यांना एका पत्राद्वारे कळविण्यात आले आहे. त्याशिवाय आवघ्या दुसऱ्या दिवशी हे कार्यालय टाळेबंद करण्यात […]
समांतर क्रांती वृत्त खानापूर: आमदार विठ्ठल हलगेकर यांनी मनमानी कारभार चालविला असल्याचा घणाघाती आरोप ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष महादेव कोळी यांनी केला आहे. आमदारांसाठी तालुका पंचायतच्या आवारात प्रशस्त कार्यालय असताना सुद्धा विद्यमान आमदारांनी त्यांचे नवीन कार्यालय देवराज आरस भवनमध्ये सरकारी परवानगी न घेता बेकायदेशीरपणे थाटले, असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी तहशिलदार आणि बीसीडब्लू […]
समांतर क्रांती वृत्त खानापूर: नुकताच खानापूर म.ए.समितीने कार्यकारीणीची यादी मध्यवर्ती म.ए.समितीकडे सुपूर्द केली आहे. यादीतील नावे पाहता जुने गडी अन् खेळही जुनाच अशी स्थिती आहे. त्यामुळे समितीच्या संघटन कार्याला उर्जितावस्था मिळण्याची शक्यता धूसरच आहे. विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्यानंतर समितीच्या जेष्ठ नेत्यांना शहाणपण येईल, अशी जी मराठी भाषीकांची आशा होती, ती मावळली आहे. नव्या चेहऱ्यांना […]
समांतर क्रांती वृत्त खानापूर: ट्रकमध्ये कप्पे करून त्यातून गोवा बनावटीची दारू वाहतूक करणारा २५ लाखांचा ट्रक आणि २७ लाखांच्या दारूसह दोघांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई कणकुंबीजवळ करण्यात आली. विशेष म्हणजे ट्रकमधील कप्पे तोडण्यासाठी चक्क जेसीबीचा वापर करावा लागला. चोर कितीही शिरजोर असला तरी तो कधी ना कधी सापडतोच. या आश्चर्यजनक घटनेची तालुकाभर चर्चा […]
समांतर क्रांती वृत्त खानापूर: २०२४ च्या लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. त्यामुळे साहजिकच उमेदवार निवडीचा पेचप्रसंग भाजप आणि काँग्रेससमोर आहे. कॅनरा लोकसभा मतदार संघातून सध्याचे खासदार अनंतरकुमार हेगडे यांनी ‘निवृत्ती’ घेण्याची घोषणा केली असल्याने नव्या उमेदवाराच्या शोधाला गती आली आहे. माजी आमदार अरविंद पाटील, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांच्यानंतर आता भाजपच्या राज्य कार्यकारीणी सदस्य […]
समांतर क्रांती वृत्त नंदगड: शिपेवाडी आणि करंजाळ येथे आज गुरूवारी घरफोड्या केल्याच्या घटना उघडकीस आल्या. त्यामुळे नंदगड पोलीसांची अक्षरश: झोप उडाली आहे. तीन ठिकाणी चोरी झाली असून यात पाच तोळे सोन्याचे दागिण्यासह चांदी आणि रोकड लंपास करण्यात आली आहे. याबाबत नंदगड पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी, शिंपेवाडी येथील सुरेश जयराम पाटील हे त्यांच्या कुटुंबीयांसमवेत शिवारात […]
समांतर क्रांती वृत्त खानापूर: तालुक्याचे नुतन आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या ‘शासकीय’ संपर्क कार्यालयाचे उद्घाटन आज मोठ्या थाटात झाले. आमदारांसाठी तालुका पंचायत आवारात शासकीय कार्यालय असतांनाही त्या कार्यालयालयाला त्यांनी फाटा दिला. यापूर्वीच्या आमदारांचा कित्ता त्यांनी गिरवित तालुका पंचायतीच्या आवारातील कार्यालय टाळले. त्यामुळे पुन्हा एकदा आमदारांना या कार्यालयांचे वावडे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पूर्वीपासून आमदारांसाठीचे […]
बेळगाव: जानेवारी महिन्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने राज्य सरकारने कडक निर्बंध जारी केले होते. १६ जानेवारी २०२२ रोजी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकात छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला होता. त्यावेळी कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप करत कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. माजी आमदार अनिल बेनके व धर्मवीर छत्रपती संभाजीराजे […]
समांतर क्रांती वृत्त खानापूर: राज्यात काँग्रेसचे सरकार स्थापन झाल्यानंतर विरोधकांच्या बुडाला जणू आग लागली होती. पाच योजना कशा राबविणार असा प्रश्न विचारीत मोर्चे आंदलने केली जात होती. पण, आज त्याच योजनांचा लाभ घेऊन राज्यातील जनता खूष आहे. त्यामुळे भाजपच्या नेत्यांना तोंड दाखवायलाही जागा राहिलेली नाही. जनतेची दिशाभूल करण्यात भाजपचे नेते कोणत्या थराला जातात, हे जनतेला […]
समांतर क्रांती वृत्त खानापूर: मान्सून लांबल्यामुळे हावलदिल झालेल्या बळीराजाला जुलै महिन्यातील पावसाने दिलासा दिला होता. तरीही भात लागवड लांबलीच, आता कुठे भात लागवडीची कामं हातावेगळी करीत असतांना पुन्हा पावसाने हुलकावणी दिली आहे. तालुक्यातील सुमारे ३२ हजार हेक्टरमध्ये यंदा भात पेरणीसह लागवड करण्यात आली आहे. पण, पावसाअभावी भात पिक करपून जाऊ लागल्याने शेतकरी हत:श झाला आहे. […]