Category: HOME
खानापुरात २३ रोजी ‘वनहक्का’संदर्भात कार्यशाळा
खानापूर: तालुका वनहक्क संघर्ष समितीच्यावतीने सोमवार दि. २३ रोजी येथील शिवस्मारकात अरण्य समित्यांच्या पदाधिकाऱ्यांसाठी एक दिवसाच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. अरण्यहक्क समित्यांचे हक्क, अधिकार आणि कार्यपध्दती तसेच अरण्य हक्कांचे वैयक्तीक व सामुदायिक दाव्यांचे प्रस्ताव कसे बनवावेत, यासंदर्भात खानापूर तालुक्यातील अरण्यहक्क समिती अध्यक्ष, सचीव आणि सदस्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. कार्यशाळेत श्रमिक मुक्ती दलाचे कार्याध्यक्ष […]
भाऊ बनला वैरी, बेकवाडात तरूणाचा खून
याबाबतची अधिक माहिती अशी, तालुक्यातील बेकवाडजवळच्या बाळेकोड शिवारातील एका घरासमोर यल्लाप्पा याचा मृतदेह आढळून आला. त्याच्यावर शस्त्रास्त्राने वार करण्यात आल्याने त्याचा खून झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. नंदगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची पाहणी करून मृतदेहाची उत्तरीय तपासणी केली. गेल्या कांही वर्षांपासून भावाभावामध्ये जमिनीच्या वादातून भांडन होत होते. काल बुधवारी झालेल्या […]
मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे विविध स्पर्धा
खानापूर: मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानच्यावतीने जानेवारीच्या शेवटच्या आणि फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत अध्यक्ष नारायण कापोलकर यांनी दिली. यंदा प्रतिष्ठान तपपुर्ती साजरी करीत असून त्या अनुषंघाने निबंध, वकृत्व, गायनसह सामान्यज्ञान-प्रज्ञाशोध परिक्षांचे आयोजन करण्यात आले असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. याप्रसंगी उपाध्यक्ष मऱ्याप्पा पाटील, सचिव वासुदेव चौगुले, सदस्य प्रल्हाद […]
‘मांजरी’च्या गळ्यातली घंटा
गावगोंधळ / सदा टीकेकर सर्रास सरकारी अधिकारी आणि कर्मचारी स्थानिक आमदारांच्या ताटाखालची मांजरं असतात, असा अस्मादिकांचा अनुभव. त्यांच्यात दलाली कोण करीत असतील ते ‘सरकारी’ ठेकेदार. विशेषत: विकास कामांचे ठेके अशाच ठेकेदारांनाच मिळत असतात. आमदारांची आणि सर्वच लोकप्रतिनिधींची अशा ठेकेदारांवर खप्पामर्जी असते. त्याचा गैरफायदा (मुदलात तो फायदाच असतो. कारण आमदार आणि अधिकारी यांच्यातील दलालीत एवढे तरी […]
नेत्यांनो, आता तरी लाज वाटेल का?
संडे स्पेशल / चेतन लक्केबैलकर बॅनरनी खानापूर शहराचेच नव्हे तर तालुक्यातील अनेक गावांचे सौंदर्य झाकोळून गेले आहे. तालक्यातील नेत्यांनी त्यांचे बॅनर झळकावून स्वत:चे ‘मोठे’पण झळकावण्याची जणू स्पर्धाच भरविली आहे. ज्याचे जेवढे मोठे बॅनर तेवढी प्रसिध्दी अधिक असे समिकरण बनत चालले आहे. पण, रामगुरवाडी गावाच्या वेशीवर लागलेल्या एका बॅनरने या सगळ्याच लोकप्रतिनिधी आणि नेत्यांची लाज काढली […]
रामनगर: माध्यान्ह आहार कर्मचाऱ्यांवर पालकांनीच केली कारवाई
जोयडा: रामनगर हनुमान गल्ली येथील प्राथमिक हिरीय सरकारी शाळेत माध्यन आहार बनविणाऱ्या महिला बेजबाबदारपणे काम करीत होत्या, त्यांच्यामध्ये वारंवार होणारे वाद यामुळे मुलांना योग्य दर्जाचे अन्न मिळत नव्हते, मुलांसाठी असलेल्या अन्न धान्याचा दुरपयोग होत होता, त्यामुळे शाळेत जेवण बनविणाऱ्या तिन्ही महिलांना कामावरून काढले आहे, यामध्ये कोणालाही जातीवरून त्रास दिला नाही, अशी माहिती शाळा विकास आणि […]
स्पष्ट भूमिका घ्या, आम्ही सज्ज आहोत
जोयडा: आगामी विधानसभा निवडणुक कोणत्या पक्षातून लढविणार, यासंदर्भात माजी विधान परिषद सदस्य एस एल घोटणेकर यांनी लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी रामनगर येथे केली. त्यात निवडणूक लढविण्यास आपण सज्ज असून या महिन्यात योग्य तो निर्णय घेऊ, असे सांगत एस एल घोटणेकर कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे आवाहन केले आहे.एस एल घोटणेकर यांनी रामनगर येथील […]
धरण तुमचं.. मरण आमचं..!
सुपा विस्थापितांच्या जमिनी 40 वर्षे पाण्याविना काळी नदीच्या पाण्याला उत्तर कर्नाटकाची वाट? बम्मू फोंडे/जोयडा पाण्याने समृद्ध असलेल्या शेत जमिनिंचा सुपा धरणासाठी त्याग केलेल्या विस्थापिताना रामनगर येथे जमिनी दिल्या आहेत , पण त्या जमिनी लागवडीखाली आणण्यासाठी गेल्या 40 वर्षात पाण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली नाही. त्यामुळे सुपा धरणाच्या पाण्यावर होणाऱ्या वीजनिर्मितीतून राज्याला उजेड देणाऱ्या रामनगर वासियांच्या […]
आश्वासने गोल-गोल, जीव झालेत कवडीमोल
चेतन लक्केबैलकर आश्वासनांची खैरात करून जनसामान्यांना गुंतवून ठेवण्याचा चंग बांधून आगामी निवडणुकीत इस्पित साध्य करून घेण्याचा ध्यास तालुक्यातील इच्छूक उमेदवारांनी घेतला आहे. त्यात म.ए.समितीचे नेते, काँग्रेसच्या सर्वेसर्वा आमदार डॉ. अंजली निंबाळकर आणि तालुक्याच्या विकासाचा महामेरू पेलत असल्याचा अभास निर्माण करणाऱ्या भाजपच्या नेत्यांसह ‘भायल्यां’चाही समावेश आहे. मात्र, त्यांच्या या आश्वासनांमुळे सर्वसामान्यांचे जीव कवडीमोल झाले आहेत. तालुक्यातील […]