समांतर क्रांती वृत्त लोंढा: नकटीच्या लग्नाला सतरा विघ्न अशी खानापूर-महामार्गाची अवस्था झाली आहे. आधीच काम अर्धवट आहे, त्यात आज सकाळी लोंढाजवळील नव्याने बांधण्यात आलेला पूल कोसळला आहे. रस्त्यादेखील खचला असून वाहतूक पर्यायी मार्गांनी वळविण्यात आली आहे. कंत्राटदार आणि महामार्ग प्राधिकरणाच्या अंदाधुंद कारभाराचा फटका प्रवाश्यांना बसत आहे.
समांतर क्रांती / रविवारची मुलाखत अलिकडे बांधावरच्या शेतकऱ्यांची संख्या वाढली आहे. तशीच पंचायतीच्या कार्यालयात आणि गावाच्या पारावर बसून विकासाच्या गप्पा हाणणारेही ‘पायलीस पंधरा’ मिळतील. पण, खूप कमी सदस्य जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी पंचायतीचे कार्यालय दणाणून सोडतांनाच प्रत्यक्ष विकास कामावर हातात टिकाव आणि फावडा घेऊन कामाला लागतात. जांबोटी ग्राम पंचायतीच्या अध्यक्ष-उपाध्यक्षांची नुकताच निवड झाली. यात जास्त चर्चेत […]
खानापूर: कर्नाटक राज्य ज्येष्ठ नागरिक संघटनेची खानापूर शहरात चिरमुर गल्ली येथील ज्ञानेश्वर मंदिरामध्ये मासिक बैठक नुकतीच पार पडली. संघटनेचे अध्यक्ष श्री.बनोशी आणि प्रमुख पाहुणे तोपिनकट्टी महालक्ष्मी संस्थापक संचालक चांगाप्पा निलजकर, अरविंद कुलकर्णी, सुभाष देशपांडे, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि श्री देवेगौडा चारिटेबल ट्रस्ट हॉस्पिटलचे बेळगाव येथील डॉ. फरात मुल्ला व डॉ. नागराज राठोड यांच्या […]
समांतर क्रांती वृत्त खानापूर: नाथाजीरावांचे कार्यकर्तृत्व मोठे आहे. केवळ शून्यातून स्वप्नवत विश्व निर्माण करण्याची किमया त्यांच्या कार्यामुळेच ‘मराठा मंडळ’ या संस्थेने साधली आहे. कर्नाटकात नावाजलेल्या संस्थांमध्ये स्वतःचे स्थान निर्माण करण्याचा मान नाथाजीरावांच्या अचाट कर्तृत्वामुळेच ‘मराठा मंडळ’ या संस्थेला मिळाला आहे. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी या तत्त्वावर जगत स्वतःला संस्थेच्या कार्यात समर्पित करत सतत संस्थेच्या […]
समांतर क्रांती विशेष खानापूर: हा तालुका म्हणजे सरकारी अधिकारी, त्यांचे स्थानिक दलाल आणि लोकप्रतिनिधींच्या सेवेचा आव आणणाऱ्या लाळपुस्यांचे कुरण झाला आहे. लोकप्रतिनिधी बदलतात, पण परिस्थिती जैसे थेच राहते. भाजपचे विठ्ठल हलगेकर यांनी आमदारकीची सूत्रे स्विकारून तीन महिन्यांचा कालावधी उलटत आला. तरीही तालुक्यात कांही बदल होतील, अशी आशा राहिली नाही. तसे वातावरण त्यांनी स्वत:च निर्माण करून […]
समांतर क्रांती वृत्त जांबोटी: तालुक्यातील आमटे ग्राम पंचायतीच्या अध्यक्षपदी सरस्वती कृष्णा भरणकर तर उपाध्यक्षपदी लक्ष्मण बाळकृष्ण गुरव यांची अविरोध निवड झाली. अध्यक्षपदासाठी अवर्ग महिलेसाठी आरक्षण जाहीर झाले होते. सरस्वती भरणकर या एकमेव असल्याने त्यांना संधी मिळाली. तर उपाध्यक्षपदासाठी मागासवर्गीय आरक्षण होते. सदस्यांनी एकमतांने लक्ष्मण बाळकृष्ण गुरव यांना उपाध्यक्ष म्हणून संधी दिली. निवडणूक अधिकाऱ्यांनी निवड जाहीर […]
विरोधकांना पळती भूई थोडी; अध्यक्षपदासाठी चुरशीची लढत समांतर क्रांती वृत्त खानापूर : हलशी ग्राम पंचायतीच्या निवडणुकीत अध्यक्षपदी पांडुरंग लक्ष्मण बावकर यांनी विजय मिळविला आहे. तर उपाध्यक्षपदी आश्विनी देसाई यांची अविरोध निवड झाली. या निवडणुकीत अकरा पैकी सहा मते मिळवून पांडूरंग बावकर यांनी बऱ्याच वर्षापासून पंचायतीवर कब्जा केलेले केएलई संस्थेचे संचालक संतोष हंजी यांचा दणदणीत पराभव […]
समांतर क्रांती विशेष / चेतन लक्केबैलकर On July 23 marks the 50th anniversary of the release of the 1970s hit film Abhimaan starring Amitabh Bachchan and Jaya Bachchan. चित्रपट सृष्टीतील बादशाह अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या अभिनयाने नटलेला आणि सत्तरच्या दशकात प्रचंड गाजलेल्या अभिमान चित्रपटाला प्रदर्शित झाल्याला २३ जुलै रोजी ५० वर्षे पूर्ण होत […]
समांतर क्रांती वृत्त खानापूर: तालुक्यातील कांही ग्राम पंचायतींची निवडणूक आज पार पडली. यामध्ये आरक्षणामुळे कांही निवडी अविरोध झाल्या तर कांही ठिकाणी चुरशीची लढत पहावयास मिळाली. जांबोटी ग्रा. पं.च्या उपाध्यक्षपद निवडीत धक्कादायक निकाल लागला. वडगावचे सुनिल शंकर देसाई यांना त्यांच्या सहकाऱ्यांनी अनपेक्षीत साथ देत सर्वानाच धक्का दिला. चापगाव ग्रा.पं.ची निवडणूक अटीतटीची झाली. यात म.ए.समितीला निर्विवाद वर्चस्व […]
समांतर क्रांती वृत्त चापगाव: येथील ग्राम पंचायतीच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या अटीतटीच्या लढतीत ५ विरुध्द ४ असे मतदान झाल्याने अध्यक्षपदाच्या निवडीत गंगव्वा सिध्दप्पा कुरबर (वड्डेबैल) यांनी नजिर सनदी यांचा तर उपाध्यक्षपदाच्या निवडीत मालूबाई अशोक पाटील यांनी लक्ष्मी हणमंत मादार यांचा पराभव केला. पशू वैद्याधिकारी डॉ. उमेश होसूर यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. ग्रा.पं.सदस्य नागराज यळ्ळूकर, सूर्याजी […]