समांतर क्रांती वृत्त 40 villages in Khanapur taluka are island-like खानापूर: मणतर्गेजवळच्या पुलावर आज दुसऱ्या दिवशीही पाणी आल्यामुळे शिरोली भागातील अनेक गावांचा शहराशी संपर्क तुटला आहे. संततधार पावसामुळे तालुक्यातील अनेक नदी-नाल्यांना पूर आल्यामुळे सुमारे ३० ते ४० गावांना बेटाचे स्वरूप आले आहे. मणतुर्गेसह विविध पुलांवर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून वाहतूक बंद करण्यात आली […]
समांतर क्रांती वृत्त कॅसलरॉक: ‘चेन्नई एक्स्प्रेस’ चित्रपटामुळे संपूर्ण देशात प्रसिध्दीस पावलेल्या दूधसागर धबधब्याचे दर्शन सध्या दुर्मिळ झाले आहे. कारण, गोवा सरकारच्या वनखात्यासह रेल्वे खात्यानेदेखील धबधब्याला जाण्यावर बंदी घातली आहे. गेल्या शनिवारी आणि रविवारी दुधसागर बघण्यासाठी शेकडो पर्यटक गेले होते. त्यांना रेल्वे पोलिसांनी चक्क उठाबशा काढण्याची शिक्षा देत त्यांना वापस धाडल्यामुळे पर्यटकांचा निरस झाला. दूधसागर बघण्यासाठी […]
समांतर क्रांती वृत्त खानापूर: बापाने मतिमंद मुलाचा विष पाजून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. मुलगा मतिमंद आहे, त्यामुळे धाकट्या मुलाचे लग्न जमणार नाही, या विवंचनेतून बापाने मतिमंद मुलाला विष पाजून संपविले. एका मुलाचे भवितव्य घडवू पाहणाऱ्या बापाने दुसऱ्या मुलाचा निर्घूणपणे खून करावा, ही अजब घटना खानापूर येथील मलप्रभा नदीकाठावर ३० मे रोजी घडली. या […]
समांतर क्रांती खानापूर: दहा बाय दहाचे चहाचे दुकान. त्यात दोघांना बसता येईल, असे विसेक गाळे. एरवी, स्मशान शांतता असणाऱ्या या दुकानात कॉलेज सुटले की जणू किलबिलाट सुरू होते. नेमके या कॅफेंमध्ये दडलंय काय? असा प्रश्न सर्रास सगळ्यांनाच पडतो. पण, त्याकडे लक्ष देतंय कोण? या कॅफेंमध्ये काय दडलंय, याचा खुलासा शुक्रवारी झाला. शहरात तीन-चार अशी चहाची […]
चांद्रयान ३ आवकाश झेपावले. त्याच्या उड्डाणासाठीच्या रॉकेटच्या निर्मितीत योगदान दिलेले इस्रोचे वैज्ञानिक आणि अनगडीचे सुपुत्र प्रकाश पेडणेकर यांच्याबद्दल त्यांना विज्ञानाचे बाळकडू पाजणारे त्यांचे शिक्षक तथा कवि-लेखक संजीव वाटूपकर यांनी ‘समांतर क्रांती’कडे व्यक्त केलेले हे मनोगत… श्री प्रकाश नारायण पेडणेकर हा आपल्या मराठा मंडळ कापोली हायस्कूलचा हुशार विद्यार्थी. प्रकाश मुळातच हरहुन्नरी आणि चौकस होता. PUC ची […]
समांतर क्रांती वृत्त खानापूर: तुम्हाला सर्वसामान्यांना न्याय देता येत नाही. सगळेच हतबल झाले आहेत. म्हणून जे न्यायदान करण्यासाठी झटतात, त्यांना रस्त्यावर उतरावे लागले आहे. लवकरात लवकर बसची समस्या सोडवा, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम होतील, असा सज्जड दम माजी आमदार अरविंद पाटील यांनी बस आगार व्यवस्थापकांना दिला. तालुक्यातील बसव्यवस्था विस्कळीत झाल्यामुळे आज शुक्रवारी वकिलांनी रास्तारोको केला. […]
समांतर क्रांती वृत्त नंदगड: फ्रान्समध्ये होत असलेल्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमुळे विशेष चर्चेत असलेल्या बॅस्टिल परेडमध्ये नंदगड येथील २१ वर्षीय तरूणाने सहभाग घेतला आहे. रचेत शिवानंद तुरमुरी असे त्याचे नाव असून तो नेव्हीमध्ये कम्यूनिकेशन अधिकारी पदावर कार्यरत आहे. फ्रान्सच्या दौऱ्यातील त्याच्या सहभागाबद्दल त्याचे अभिनंदन होत आहे. बॅस्टिल डे परेडला फ्रांन्समध्ये राष्ट्रीय दिवस म्हणून […]
समांतर क्रांती विशेष आज शुक्रवारी (१४ जुलै) हा दिवस देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल. भारताकडून चांद्रयान- ३ दुपारी २ वाजून ३५ मिनिटांनी श्रीहरीकोटा येथून चंद्राच्या दिशेने झेपावेल. हा खरंच देशवासीयांसाठी अभिमानाचा क्षण आहे. तसाच तो खानापूर तालुकाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणाराही आहे. कारण, या चांद्रयानाच्या यशस्वी उड्डाणासाठी तालुक्यातील अनगडी येथील प्रकाश पेडणेकर या युवा वैज्ञानिकाचा […]
समांतर क्रांती वृत्त / प्रसन्न कुलकर्णी खानापूर : शेतमजुरांची कमतरता ही सध्याची मोठी समस्या बनत चालली आहे. शेतीत खत आणि औषधांचे शिंपण करण्यासाठी मजूर मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत असतांना आता त्यावर उपाय सापडला आहे. ड्रोनच्या सहाय्याने शिवारात औषध फवारणीसारखी कामे करणे सोपे बनले आहे. तालुक्यातील गंदीगवाड प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संस्थेच्या चालकांनी गंदीगवाड व आजूबाजूच्या […]
समांतर क्रांती वृत्त खानापूर: शिकार करायला गेले आणि स्वत:हून जाळ्यात अडकले,अशी घटना बुधवारी रात्री बरगावजवळ घडली. गर्लगुंजीला जाणाऱ्या रस्त्याला लागून असलेल्या साई मंदिरात चोरी करण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसलाच शिवाय ते आयतेच पोलिसांच्या तावडीत सापडले. त्याचे असे झाले; रात्री उशिरा तिघांनी साई मंदिराचे शटर तोडून दान पेटी फोडण्याचा प्रयत्न केला. यावेळी मंदिराशेजारी उद्योजक के.पी.पाटील त्यांच्या वाहनात […]