‘समांतर क्रांती’च्या वृत्ताचे पडसाद बैठकीत उमटले; पदाधिकाऱ्यांना धारेवर धरले! खानापूर: तालुका म.ए.समितीच्या पदाधिकाऱ्यांनी नैतिक जबाबदारी स्विकारून राजिनामे द्यावेत, अशी जोरदार मागणी नेत्यांसह कार्यकर्त्यांनी केल्याने अखेर अध्यक्ष, कार्याध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांनी राजिनामे सादर केले. तात्काळ कार्यकारिणी बरखास्त करीत तूर्तास समितीची धूरा माजी आमदार दिगंबर पाटील आणि ता.पं.माजी सभापती मारूती परमेकर यांच्याकडे सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला. समांतर क्रांतीने याबाबत […]
विधानसभा निवडणुकीत समितीचे उमेदवार मुरलीधर पाटील यांना दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत केवळ तोंडदेखली चर्चा झाली. पण, पुढील काळात समितीला उर्जितावस्था मिळवून देण्याबाबत ठोस चर्चा झालीच नाही. समिती नेत्यांचे काय चालले आहे, असा प्रश्न सामान्य मराठी भाषिकांना पडला असून कार्यकारिणीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी राजिनामे द्यावेत, अशी मागणी होत आहे. कांही कार्यकर्ते आणि […]
समांतर क्रांती स्पेशल बंगळुरातील अधिकाऱ्यांच्या सभेला काँग्रेसचे प्रभारी रणदीपसिंह सुरजेवाला उपस्थित राहिल्याचा आरोप करीत राज्य भाजपने रान पेटविले आहे. असाच प्रकार खानापुरातही नुकताच घडला असून तालुका विकास आढावा बैठकीला भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी उपस्थित राहिल्याबद्दल चर्चेला उधाण आले आहे. यापूर्वीही अधिकाऱ्यांच्या बैठकीत भाजप कार्यकर्त्यांच्या उपस्थितीने लक्ष वेधून घेतले होते. दोन दिवसांपूर्वी येथील तालुका पंचायतीच्या […]
खानापूर: कर्जबाजारी शेतकऱ्याने शिवारातील काजूच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना निट्टूर येथे घडली. कल्लाप्पा बाळाराम कांजळेकर (वय ४८) असे या शेतकऱ्याचे नाव असून त्याच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुलगे, विवाहित मुलगी असा परिवार आहे. याबाबतची अधिक माहिती अशी, कल्लाप्पा यांनी विविध बँक आणि सहकारी संस्थांकडून कर्ज घेतले होते. त्याची परतफेड करता न आल्याने ते […]
समांतर क्रांती विशेष निवडणूक म्हटलं की, कार्यकर्त्यांचा जोष, नेत्यांचा हैदोस ठरलेलाच असतो. सहकारी संस्थांच्या निवडणुकांतही गावपातळीवरचे राजकारण उफाळून उठते. जुन्या-नव्या वादांना फोडणी देऊन इस्पित साधण्याचे कौशल्य नेते मंडळी पणाला लावतात. त्यात नेत्यांचा खेळ होतो आणि सर्वसामान्यांचा जीव जातो. पण, त्याची फिकीर कुणालाच नसते. सध्या खानापूर तालुक्यातील २५ कृषी पत्तीन सहकारी संघांच्या निवडणुकांचे रान पेटले आहे. […]
या खून प्रकरणी नागोजी परशराम सुतार (वय ५५) व ओंकार कृष्णा सुतार (वय २६) यांना पोलीसांनी अटक केली असून त्यांनी खूनाची कबुली दिली आहे. शनिवारी सकाळी लक्ष्मण यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. पोलिसांनी या घटनेचे गाभिर्य लक्षात घेऊन तपासाची चक्रे फिरविली. संशयीत आरोपी नागोजी हा मयत लक्ष्मणच्या मेहुणीचा मुलगा असून त्याचा लक्ष्मण यांच्या […]
मोठ्या पगाराची नोकरी किंवा बेफाम पैसा मिळवून देणारा व्यवसाय, चारचाकी गाडी आणि टोलेजंग बंगला, सुदरशी पत्नी आणि एखादे मुलं, ही आजच्या तरूणांची सर्वसामान्य स्वप्नं आहेत. त्याच्या पलिकडे जाऊन आपल्या समाजासाठी, आपल्या लोकांसाठी निस्वार्थपणे कार्य करण्याची संवेदनशीलता आजचा तरूण हरवत चालला आहे. केवळ चार भिंतीतलं विश्व आजच्या तरूणांना खुणावत असतांना एखादा तरूण स्वयंप्रेरणेने समाजाच्या भल्याचा विचार […]
नंदगड: डोकीत वार करून वृद्धाचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना खानापूर तालुक्यातील भूत्तेवाडी येथे उघडकीस आली आहे. लक्ष्मण यल्लप्पा सुतार (७५) असे खून झालेल्या वृद्धाचे नाव असून खुनामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. नंदगड पोलीस अधिक तपास करीत आहेत.
कणकुंबी: चोर्ला घाटात दोन कारची समोरासमोर टक्कर झाली. या अपघातात चालकासह दोघेजण जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त दोन्ही कारच्या दर्शनी भागाचा चाक्काचूर झाला असून केवळ सुदैवाने या अपघातात जिवितहानी टळली. गोव्याहून कणकुंबीच्या दिशेने येणाऱ्या कारला कणकुंबीहून गोव्याकडे जाणाऱ्या कारने चोर्ला घाटातील वळणावर समोरासमोर जोराची धडक दिली. यावेळी एका कारमधील चालकासह अन्य एकजण जखमी झाला. त्यांना तात्काळ […]
खानापूर: घर बांधून झाले तरी ग्रा.पं.कडून निधी मिळाला नाही, त्यामुळे शेजारी आणि सावकारांकडून काढलेल्या कर्जाची परतफेड करता न आल्याने महिलेने शिवारातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना अशोकनगर येथे घडली. दोडव्वा चंद्राप्पा दोडमनी (वय ४५) असे या महिलेचे नाव असून तिच्या पश्चात विवाहीत मुलगा आणि मुलगी असल्याचे समजते. अशोकनगर येथील चंद्रव्वा यांचा मुलगा गवंडी कामानिमित्त […]