राज्यातील ६२ आयपीएस अधिकाऱ्यांना बढतीची लॉटरी बंगळूर: सरत्या वर्षाच्या पुर्वसंध्येला राज्यातील आय.पी.एस. अधिकाऱ्यांना नववर्षाची भेट राज्य सरकारने दिली आहे. ६२ आपीएस अधिकाऱ्यांना बढती मिळाली असून त्यापैकी चार जणांची बदली करण्यात आली आहे. तर उर्वरित सर्व अधिकाऱ्यांच्या वेतनश्रेणीत वाढ करून सध्या कार्यरत ठिकाणीच सेवा कायम करण्यात आली आहे. पुढील आदेशापर्यंत हे अधिकारी त्याच ठिकाणी सेवा बजावतील, […]
समांतर क्रांती / खानापूर शॉर्टर्कीमुळे ऊसाला आग लागलेल्याने झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याचे आदेश देऊनही दुर्लक्ष केल्याने न्यायालयाने आज शुक्रवारी (ता.२०) हेस्कॉमला झटका दिला. अलिकडेच उद्घाटन झालेल्या हेस्कॉम कार्यालयातील तब्बल चार लाखांचे साहित्य जप्त करण्यात आले असून हेस्कॉमवर नामुष्की ओढवली आहे. चिक्कहट्टीहोळ्ळी येथील इरण्णा सन्नकी, बाबू पटगार, सिध्दाप्पा पुजारी आणि इराप्पा दास्तीकोप्प यांच्या ऊसाला शॉर्टसर्कीटमुळे आग […]
समांतर क्रांती / खानापूर येथील मिनिविधानसौध म्हणजे तहसिल कार्यालय आवार हा समस्यांचे आगार आणि वाहनतळ बनले आहे. विशेष म्हणजे येथे वाहने लावू नयेत, असा फलक असलेल्या ठिकाणीच कर्मचारी आणि अधिकारी त्यांची वाहने थांबवितात. यावरून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा ‘सामाजिक’ अशिक्षितपणाच उघडा पडत आहे. मिनीविधानसौधच्या प्रवेशद्वारावर उजव्या बाजुला ‘नो पार्किंग’ या इंग्रजी फलकासह अन्य एक फलक लावण्यात […]
समांतर क्रांती / ब्युरो रिपोर्ट मंगळवारी (१६) खानापूर पोलिस स्थानकाचे हेड कॉन्स्टेबल जयराम हमन्नावर यांची तडकाफडकी बदली झाल्यानंतर आता पुढचा नंबर कुणाचा? पोलिस खात्यातीलच ‘थ्री स्टार’ अधिकाऱ्याची उचलबांगडी होणार असल्याची खमंग चर्चा पोलिस खात्यात आहे. गेल्या कांही महिन्यांपासून खानापूर पोलिस स्थानक हद्दीत भ्रष्टाचाराची बजबजपुरी माजली आहे. त्याचाच हा परिपाक आहे. तालुक्यातील सत्तापालट झाल्यानंतर पारदर्शक प्रशासनाची […]
समांतर क्रांती / बेळगाव खानापूर तालुक्यातील नंदगड आणि बिडी ग्राम पंचायतींना नगर पंचायतीचा दजार देण्याची मागणी आमदार विठ्ठल हलगेकर यांनी आज बुधवारी विधानसभेत केली.उत्तर कर्नाटक विकासासंदर्भातील चर्चेवेळी त्यांनी हा मुद्दा मांडला. यावेळी त्यांनी तालुक्याच्या विकासासाठी शंभर कोटींचे विशेष पॅकेज मंजूर करण्याची मागणीही केली. यावेळी बोलतांना श्री. हलगेकर म्हणाले, खानापूर हा बेळगाव जिल्ह्यातील अतिदुर्गम तालुका आहे. […]
समांतर क्रांती / खानापूर येथील पोलिस स्थानकातील बहुचर्चीत हेड कॉन्स्टेबल जयराम हमन्नावर यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून खानापूर तालुक्यात कार्यरत असलेल्या जयराम यांना शहरातील लॉजवरील छापा प्रकरण भोवले असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तशी चर्चा सध्या खानापूरात सुरू आहे. गेल्या अनेक वर्षांपासून जयराम हमन्नावर हे खानापूर आणि नंदगड येथे सुध्दा कार्यरत […]
न्यायलयीन खटल्यातून मुक्त होण्याची संधी; न्यायालयीन शुल्कही होणार माफ खानापूर: कौटुंबिक, स्थावर आणि जंगम मालमत्तेचे वाद, धनादेश न वटणे, सहकारी संस्थांच्या कर्जफेडीसह विविध प्रकारच्या प्रलंबीत खटले निर्गत करण्यासाठी दि. ८ जुलै रोजी येथील जेएमएफसी न्यायालयात लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. याचा लाभ खानापूर तालुक्यातील संबंधीतांनी घ्यावा, असे आवाहन वरिष्ठ न्यायालयाच्या न्या. झरिना यांनी पत्रकार […]