खानापूर तालुक्यातील दोन, महाराष्ट्रातील चार माऊलींची भेट मलप्रभेच्या उगमस्थानी १४ वर्षानंतर झाली भगिणींची भेट जांबोटीकर सरदेसाईंना मानपान, पहिल्या ओटीचा मान कोदाळी, गुंळब, कळसगादे, केंद्रे (वीजघर) येथील माऊली आल्या भेटीला.. कणकुंबी/चेतन लक्केबैलकर: कळसा प्रकल्पामुळे तीन्ही राज्यात नेहमीच चर्चेत राहणाऱ्या आणि याच प्रकल्पामुळे राज्याराज्यातील वाद निर्माण झालेल्या कणकुंबीत १४ वर्षानंतर सहा माऊली भगिणींची भेट झाली आणि कणकुंबीचे […]
खानापूर: तालुका वनहक्क संघर्ष समितीच्यावतीने सोमवार दि. २३ रोजी येथील शिवस्मारकात अरण्य समित्यांच्या पदाधिकाऱ्यांसाठी एक दिवसाच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. अरण्यहक्क समित्यांचे हक्क, अधिकार आणि कार्यपध्दती तसेच अरण्य हक्कांचे वैयक्तीक व सामुदायिक दाव्यांचे प्रस्ताव कसे बनवावेत, यासंदर्भात खानापूर तालुक्यातील अरण्यहक्क समिती अध्यक्ष, सचीव आणि सदस्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. कार्यशाळेत श्रमिक मुक्ती दलाचे कार्याध्यक्ष […]
संडे स्पेशल / चेतन लक्केबैलकर बॅनरनी खानापूर शहराचेच नव्हे तर तालुक्यातील अनेक गावांचे सौंदर्य झाकोळून गेले आहे. तालक्यातील नेत्यांनी त्यांचे बॅनर झळकावून स्वत:चे ‘मोठे’पण झळकावण्याची जणू स्पर्धाच भरविली आहे. ज्याचे जेवढे मोठे बॅनर तेवढी प्रसिध्दी अधिक असे समिकरण बनत चालले आहे. पण, रामगुरवाडी गावाच्या वेशीवर लागलेल्या एका बॅनरने या सगळ्याच लोकप्रतिनिधी आणि नेत्यांची लाज काढली […]
सहकार / चेतन लक्केबैलकर कांही माणसं अतिमहत्वाकांक्षी असतात. त्यांना त्यांचे ध्येय गाठल्याशिवाय चैन पडत नसते. त्यासाठी ती एखाद्या मढ्याच्या छाताडावर पाय ठेवून सोपान चढायलाही मागे पुढे पाहत नाहीत. तर कांही जणांची महत्वाकांक्षा आभाळाला भिडण्याची जरी असली तरी त्यांची चिमणी होऊन दाणे टिपण्याचीही कुवत नसते. या मधल्या पोकळीत जी माणसं असतात, ती खऱ्या अर्थाने यशाचे शिखर […]
खानापूर: म.ए.समितीच्या दोन्ही गटात एकी घडवून आणण्यासाठी मध्यवर्ती म.ए.समितीने पुढाकार घेतला आहे. बुधवारी (ता. ०९) सकाळी ११ वाजता यासंदर्भात शिवस्मारकात बैठक आयोजित करण्यात आली असून दोन्ही गटांचे नेते-कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून मते मांडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. काळ्यदिनी एकीची संभाव्य प्रक्रिया रखडल्यामुळे गर्लगुंजी येथील माऊली ग्रूप आणि समितीनिष्ठ मराठी भाषिकांनी मध्यवर्ती म.ए.समितीच्या नेत्यांची बेळगावात भेट घेतली […]
खानापूर: गोपाळ देसाई यांच्या गटाने वाकडी वाट करीत बुडाखाली शेपूट घातल्यामुळे एकीचा प्रयत्न पुन्हा बारगळला. माजी आमदार दिगंबर पाटील यांच्या गटातील नेत्यांनी मनाचा मोठेपणा दाखवित गोपाळ देसाई गटाच्या आंदोलनस्थळी जाऊन मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी गर्लगुंजी येथील माऊली ग्रूपने महत्वाची भूमिका बजावली. पण, त्यांच्याही आपेक्षांवर विरजन पडले. किमान काळ्यादिनी तरी दोन्ही समित्या एकीची संधी साधतील, […]
कारण-राजकारण चेतन लक्केबैलकर ‘बेळगाव, कारवार, निपाणी, खानापूर, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र’ हे शब्द कानावर पडताच दुसऱ्याक्षणी ‘झालाच पाहिजे’चा प्रतिसाद लाभला नाही तरच नवल! गेल्या ६५ वर्षांपासून या घोषणेने भाषा आणि संस्कृतीसाठीचा प्रदीर्घ लढा जिवंत ठेवला आहे. आता संयुक्त महाराष्ट्र ‘झालाच पाहिजे’ऐवजी एकी ‘झाली पाहिजे’ अशी दुर्दैवी हाक मराठी भाषकांना त्यांच्या नेत्यांना द्यावी लागत आहे. […]
खानापूर: वनवासींच्या विविध मागण्यांसाठी सोमवारी (ता.३१) येथील तालुका पंचायत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले जाणार आहे. पिडीतांनी मोठ्या संख्येने ऊपस्थित राहण्याचे आवाहन खानापूर तालुका वनहक्क संघर्ष समितीने केले आहे. गेल्या वर्षभरापासून समितीच्या माध्यमातून जंगलात राहणाऱ्या गवळी-धनगर, सिध्दी आणि कुणबी मराठा समुदायाला अतिक्रमीत जमिन कायम मालकी हक्काने मिळावी, वनहक्क कायद्याची प्रभावी अमलबजावणी व्हावी, त्यांना वीज, पाणी व […]