बेळगाव : राज्यात जिल्हा आणि तालुका पंचायती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. या प्रलंबीत निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने जय्यत तयारी चालविली आहे. एप्रिल-मेमध्ये या निवडणुका होणार असल्याचे राज्य निवडणूक आयुक्त संग्रेशी यांनी स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे यावेळी या तालुका आणि जिल्हा पंचायतीसह स्वराज्य संस्थांचे मतदान इव्हीएम मशिनऐवजी बॅलेट पेपरवर घेतले जाणार आहे. […]
समांतर क्रांती / खानापूर येथील भूविकास बँकेच्या आज शनिवारी (ता.२८) झालेल्या निवडणुकीत गर्लगुंजीतून विद्यमान संचालक विरुपाक्षी पाटील (बरगाव) यांचा एकतर्फी विजय झाला. तर कक्केरी मतदार संघात प्रकाश आंग्रोळी आणि निळकंठ गुंजीकर यांच्यात काँटे की टक्कर झाली. दोघांनाही समसमान १२ मते मिळाली. त्यामुळे चिठ्ठी काढण्यात आली, त्यात निळकंठ गुंजीकर यांना संचालकपदाची लॉटरी लागली. बँकेच्या १५ पैकी […]
समांतर क्रांती / खानापूर येथील भू-विकास बँकेची निवडणूक नेहमीच प्रतिष्ठेची बनते. पण, यावेळी सर्वपक्षीयांच्या सहकार्यातून बँकेच्या १५ पैकी १३ संचालकांची निवड अविरोध करण्यात आली आहे. केवळ गर्लगुंजी आणि कक्केरी या दोन मतदार संघातील निवड अविरोध होऊ शकली नाही. त्यामुळे शनिवारी (ता.२८) निवडणूक होणार आहे. अविरोध निवड झालेल्यांमध्ये विद्यमान चेअरमन मुरलीधर गणपतराव पाटील यांची भूविकास बँकेवर […]
खानापूर: उद्या शुक्रवारी (ता.२०) सका़ळी १०.३० वाजता खानापूर ब्लॉक कॉंग्रेसची महत्वाची बैठक शिवस्मारक येथे आयोजीत करण्यात आली आहे. बैठकीला तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष ॲड. ईश्वर घाडी आणि महांतेश राऊत यांनी केले आहे.
समांतर क्रांती / खानापूर केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला असून त्यांचा निषेध नोंदविण्यासाठी उद्या गुरूवारी (ता.१९) ११ वाजता तहशिलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. यावेळी काँग्रेसच्यावतीने तहशिलदारांना निवेदन सादर केले जाणार आहे. तरी तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्ते आणि दलित संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष ॲड. आय. आर. […]
समांतर क्रांती ब्युरो Devendra Fadnavis is the 21st Chief Minister; Who has held the post of Chief Minister of Maharashtra? महाराष्ट्राचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून गुरूवारी (५ डिसेंबर) शपतबध्द झाले. यापूर्वी त्यांनी राज्याचे आठरावे मुख्यमंत्री म्हणून ५ वर्षे १२ दिवसांचा कार्यकाळ पूर्ण केला होता. त्यानंतर औटघटकेचे आणि पहाटेचे मुख्यमंत्री होण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर नोंद आहे. […]
मणतुर्गा येथील सभेत ईश्वर बोबाटे गरजले; ॲड, घाडी, बिर्जे आणि मुतगेकरांनी डागली तोफ खानापूर: गेल्या तीस वर्षांपासून भाजप तालुक्यातील लोकांना नागवीत आहे, आता खूप झालं. त्यामुळेच आम्ही काँग्रेसच्या सोबत समर्थपणे उभे राहण्याचा निर्धार केला आहे. यावेळी आपल्या तालुक्यातील उमेदवार असलेल्या डॉ. अंजली निंबाळकर यांनाच विजयी करायचं हे ठरलंय, जनतेनेदेखील डॉ. बनंबाळकर यांनाच विजयी करण्यासा चंग […]
वेंकटेश हेगडे यांचा आरोप; शिरसी दुर्गम राहण्यास तेच कारणीभूत शिरसी: भाजपचे विश्वेश्वर हेगडे-कागेरी यांनी शिक्षणमंत्री असतांना आठवीच्या विद्यार्थ्यांना सायकल वितरण करण्याच्या योजनेत कोट्यवधींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे प्रधान सचीव वेंकटेश हेगडे- होसबाळे यांनी केला आहे. यावेळी त्यांच्यासमवेत ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष जगदीश गौडा, महिला अध्यक्षा गिता शेट्टी, जिल्हा माध्यम संयोजिका ज्योती पाटील, दीपक हेगडे-दोड्डूर, […]
गर्लगुंजी परिसरात तरूण उतरले प्रचारात, डॉ. निंबाळकरांना विजयी करण्याचे आवाहन खानापूर: लोकसभा निवडणुकीत भाजपला हद्दपार करण्याचा चंग काँग्रेससह तालुक्यातील जनतेने बांधला आहे. काँग्रेसच्या उमेदवार डॉ. अंजली निंबाळकर यांच्या प्रचारासाठी गर्लगुंजी भागातील तरूण प्रचारात गुंतले आहेत. शेत-शिवारात जाऊन हे तरूण मतयाचना करीत आहेत. तसेच राजगार हमी योजनेच्या कामावर जाणाऱ्या महिलांचीदेखील भेट घेऊन यावेळी डॉ. अंजली निंबाळकर […]
कारवार: लोकसभा निवडणुकीसाठी २० जणांनी ३६ अर्ज दाखल केले होते. त्यापैकी १४ जणांचे उमेदवारी अर्ज वैध ठरले असून सहा जणांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले आहेत. उद्या सोमवारी अर्ज माघारीचा शेवटचा दिवस असून त्यानंतर लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.एकुण उमेदवारांमध्ये काँग्रेसच्या डॉ. अंजली निंबाळकर या एकमेव महिला आहेत. होन्नावरच्या रुपा गजानन नाईक यांनीही अर्ज दाखल केला […]