कारवार: म.ए.समितीचे उमेदवार निरंजन सरदेसाई यांनी आज सोमवारी (ता.१५) त्यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला. यापूर्वी शुक्रवारी भाजपचे विश्वेश्वर हेगडे-कागेरी यांनी त्यांचा अर्ज दाखल केला होता. उद्या मंगळवारी काँग्रेसच्या डॉ. अंजली निंबाळकर उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. Niranjan Sardesai’s nomination form of M.E.Samiti filed. समितीचे उमेदवार निरंजन सरदेसाई यांनी आज सकाळी त्यांचा उमेदवारी अर्ज […]
पत्रकार परिषदेत दिली माहिती; लवकरच काँग्रेसवासी होणार खानापूर: म.ए.समितीचे माजी आमदार एल.बी.बिर्जे गुरूजी यांचे चिरंजीव आणि म.ए.समितीचे माजी कार्याध्यक्ष यशवंत बिर्जे यांनी काँग्रेस प्रवेशाचे सुतोवाच्च केले. येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी समितीला सोडचिट्टी देत असल्याचे स्पष्ट केले असून त्यांच्यासमवेत समिती आणि भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते. Yashwant Birje and many others says last ‘Jai Maharashtra’ to […]
खानापूर: उत्तर कन्नड लोकसभा मतदार संघातून भाजपचे उमेदवार विश्वेश्वर हेगडे – कागेरी यांनी शुक्रवारी (ता.१२) उमेदवारी अर्ज दाखल केला. म.ए.समितीचे उमेदवार निरंजन सरदेसाई हे सोमवारी (ता.१५) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तर मंगळवारी (ता.१६) काँग्रेसच्या उमेदवार डॉ. अंजली निंबाळकर मोठ्या शक्तीप्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तिन्ही उमेदवारांनी प्रचाराला धडाक्यात सुरूवात केली असून उमेदवारी अर्ज […]
खानापूर: युवा नेते निरंजन सरदेसाई आणि जेष्ठ नेते आबासाहेब दळवी यांनी आज गुरुवारी म.ए. समितीकडे अर्ज दाखल केले. अध्यक्ष गोपाळ देसाई आणि कार्याध्यक्ष यशवंत बिरजे यांनी त्यांचे अर्ज स्वीकारले. यावेळी त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सकाळी राष्ट्रपती आदर्श शिक्षक पदकप्राप्त आबासाहेब दळवी यांनी समितीकडे अर्ज दाखल केला. त्यानंतर निरंजन सरदेसाई यांनी त्यांचा अर्ज अध्यक्षांकडे सुपूर्द […]
खानापूर: म.ए.समितीच्या दोन्ही गटात एकी घडवून आणण्यासाठी मध्यवर्ती म.ए.समितीने पुढाकार घेतला आहे. बुधवारी (ता. ०९) सकाळी ११ वाजता यासंदर्भात शिवस्मारकात बैठक आयोजित करण्यात आली असून दोन्ही गटांचे नेते-कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून मते मांडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. काळ्यदिनी एकीची संभाव्य प्रक्रिया रखडल्यामुळे गर्लगुंजी येथील माऊली ग्रूप आणि समितीनिष्ठ मराठी भाषिकांनी मध्यवर्ती म.ए.समितीच्या नेत्यांची बेळगावात भेट घेतली […]
खानापूर: गोपाळ देसाई यांच्या गटाने वाकडी वाट करीत बुडाखाली शेपूट घातल्यामुळे एकीचा प्रयत्न पुन्हा बारगळला. माजी आमदार दिगंबर पाटील यांच्या गटातील नेत्यांनी मनाचा मोठेपणा दाखवित गोपाळ देसाई गटाच्या आंदोलनस्थळी जाऊन मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी गर्लगुंजी येथील माऊली ग्रूपने महत्वाची भूमिका बजावली. पण, त्यांच्याही आपेक्षांवर विरजन पडले. किमान काळ्यादिनी तरी दोन्ही समित्या एकीची संधी साधतील, […]
कारण-राजकारण चेतन लक्केबैलकर ‘बेळगाव, कारवार, निपाणी, खानापूर, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र’ हे शब्द कानावर पडताच दुसऱ्याक्षणी ‘झालाच पाहिजे’चा प्रतिसाद लाभला नाही तरच नवल! गेल्या ६५ वर्षांपासून या घोषणेने भाषा आणि संस्कृतीसाठीचा प्रदीर्घ लढा जिवंत ठेवला आहे. आता संयुक्त महाराष्ट्र ‘झालाच पाहिजे’ऐवजी एकी ‘झाली पाहिजे’ अशी दुर्दैवी हाक मराठी भाषकांना त्यांच्या नेत्यांना द्यावी लागत आहे. […]