समांतर क्रांती / खानापूर माचीगड-अनगडी येथील सुब्रम्हण्य साहित्य अकादमीचे २८ वे साहित्य संमेलन रविवारी (ता.२९) होणार आहे. कोल्हापूरचे साहित्यिक डॉ.बी.एम.हर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन होणार आहे. चार सत्रात हे संमेलन होणार असून चारही सत्राना महाराषष्ट्रातील नामवंत साहित्यिक हजेरी लावणार आहेत. सुब्रम्हण्य साहित्य अकादमी गेल्या २८ वर्षांपासून संमेलन आयोजनाच्या माध्यमातून साहित्यसेवा करीत आहे. यंदाच्या संमेलनात डॉ.बी.एम. […]
समांतर क्रांती / खानापूर येथील भू-विकास बँकेची निवडणूक नेहमीच प्रतिष्ठेची बनते. पण, यावेळी सर्वपक्षीयांच्या सहकार्यातून बँकेच्या १५ पैकी १३ संचालकांची निवड अविरोध करण्यात आली आहे. केवळ गर्लगुंजी आणि कक्केरी या दोन मतदार संघातील निवड अविरोध होऊ शकली नाही. त्यामुळे शनिवारी (ता.२८) निवडणूक होणार आहे. अविरोध निवड झालेल्यांमध्ये विद्यमान चेअरमन मुरलीधर गणपतराव पाटील यांची भूविकास बँकेवर […]
समांतर क्रांती / खानापूर काल सोमवारी माणिकवाडीकडे गेलेल्या हत्तींच्या कळपाने पुन्हा रात्री सावरगाळीच्या शिवारात हैदोस घालून शेकडो टन ऊसाचा फडशा पाडला. सावरगाळी येथील ज्ञानेश्वर जायाप्पा पाटील यांना लाखोंचा फटका बसला आहे. रविवारी त्यांच्याच शेतातील पाण्याचा पंप, जलकुंभ आणि पिकांचे नुकसान हत्तींच्या कळपाने केले होते. गेल्या महिनाभरापासून गुंजी वनविभागात नऊ हत्तींनी ठाण मांडले आहे. या कळपाने […]
करंबळजवळ ट्रकचा, तर मलप्रभा ग्राऊंडजवळ दुचाकीचा अपघात समांतर क्रांती / खानापूर नंदगड रस्त्यावर करंबळजवळ ट्रकचा भीषण अपघात झाल्याची घटना मंगळवारी (ता. २४) सहा वाजण्याच्या सुमारास घडली. यात चालक किरकोळ जखमी झाला आहे. तर ट्रकचा समोरील भाग चाक्काचूर झाला आहे. सदर ट्रक नंदगडहून खानापूरकडे येत होता. दरम्यान करंबळ-कौंदलदरम्यानच्या वळणावर चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने लाकूड वाहतूक करणारा […]
समांतर क्रांती / खानापूरदेशातील प्रत्येक गावात वीज पोहचल्याची घोषणा केंद्रातल्या मोदी सरकारने दहा वर्षांपूर्वी केली. पण, खानापूर तालुक्यातील काही गावांना अद्यापही वीज पोहचली नाही. मेंडील या दुर्गम खेड्यात स्वातंत्र्याच्या 80 वर्षानंतरही वीज पोहचली नसल्याने हे गाव अंधारात चाचपडत आहे.मेंडील ग्रामस्थांनी आज सोमवारी (ता. 23) येथील हेस्कॉम कार्यालयाला धडक दिली. सात वर्षांपूर्वी मेंडील गावात विजेऐवजी सौरऊर्जेची […]
समांतर क्रांती / खानापूर हत्तींनी तालुक्याच्या दक्षिण आणि पूर्व भागात अक्षरश: हैदोस मांडला आहे. रविवारी हत्तीने सावरगाळीतील शिवारात धुडगूस घालून शेती अवजारांसहीत ऊसाचे प्रचंड नुकसान केले. गेल्या आठवडाभरापासून हत्तीच्या कळपाचा या परिसरात वावर असून शेतकरी हवालदिल झाले आहेत. नुकताच जळगे येथील मळणीच्या खळ्यावर हत्तीने धुडगू घातल्याची घटना ताजी असतांनाच सावरगाळी येथे त्याने दहशत माजविली आहे. […]
समांतर क्रांती / खानापूर बेळगाव-खानापूरचा हा परिसर खूप सुंदर आहे. सौदर्य सगळ्यानाच आवडतं, पण याच सौदर्यामुळे सीमावासीयांचे हाल होत आहेत. महाराष्ट्र आणि कर्नाटक दोन्ही राज्ये या भागावर दावा करीत आहेत. भाषा आणि साहित्याच्या निवाऱ्यात राहून व्यवहार करायचा असतो, परंतु येथे निवाऱ्याबाहेर राहून व्यवहार करावा लागत आहे. परिणामी, अनेक पिढ्यांचे नुकसान झाले, ही भळभळती वेदना असल्याची […]
समांतर क्राती / खानापूर गणेबैलजवळील भूतनाथ यात्रेचा मान यंदा माळअंकले गावाला असून ही यात्रा मंगळवारपासून (ता.२४) सुरू होणार आहे. दुपारी १२ वाजता महापुजेने यात्रेला सुरूवात होईल. यावेळी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी (ता.२५) यात्रेची सांगता होणार आहे. गणेबैलजवळील भूतनाथ देवस्थानाच्या यात्रोत्सवाचा मान माळ अंकले आणि झाड अंकले या गावांना असतो. यंदा हा मान […]
समांतर क्रांती / खानापूर Power supply disrupted in Khanapur taluka on Sunday दुरूस्तीच्या कारणास्तव उद्या रविवारी (ता.२२) खानापूर तालुक्यातील उचवडे, जांबोटी, हब्बनहट्टी, देवाचीहट्टी, कालमणी, आमटे, चिखले, पारवाड, कणकुंबी, चिगुळे, हुळंद, चोर्ला आणि मान येथील वीज पुरवठा खंडीत राहणार आहे, असे हेस्कॉमने कळविले आहे.
समांतर क्रांती / रामनगर भरधाव कार मंदिरात घुसल्याने सतीदेवी मंदिर जमिनदोस्त झाल्याची घटना शनिवारी (ता.२१) धारवाड-पणजी महामार्गावर चिंचेवाडी येथे घडली. या अपघातात कारमधील प्रवासी गंभीर जखमी झाल्याने त्यांना धारवाड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. सदर कार रामनगरकडून कुंभार्डाच्या दिशेने निघाली असतांना चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार (के.ए. ५१ एमयु ४८३३) थेट मंदिरात घुसली. यावेळी कौलारू सतीदेवी […]